IND vs SL 1st T20I: भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20I Series) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना शनिवारी (27 जुलै) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव (India Beat Sri Lanka) करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्तपुर्वी या सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा पुरेपूर फायदा टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजांनी घेतला. भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच कोंडी केली. प्रथम सलामी जोडी यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुभमन गिल (Shubman Gill) आणि नंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) यांनी विरोधी गोलंदाजांना मजबूक धूतला. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांनी 200 हून अधिक धावा केल्या.
टीम इंडियाच्या सर्व फलंदाजांनी चांगला खेळ केला
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 7 विकेट गमावून 213 धावा केल्या. भारतीय संघाकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 58 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीदरम्यान सूर्याने 8 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले. या काळात सूर्याचा स्ट्राइक रेट 223.08 होता. याशिवाय ऋषभ पंतने 33 चेंडूत 49 धावा, यशस्वी जैस्वालने 21 चेंडूत 40 धावा आणि शुभमन गिलने 16 चेंडूत 34 धावा केल्या.
A 43-run victory in the first T20I! 🙌#TeamIndia take a 1-0 lead in the series 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/Ccm4ubmWnj #SLvIND pic.twitter.com/zZ9b1TocAf
— BCCI (@BCCI) July 27, 2024
टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध मोठा पराक्रम
या मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 200 हून अधिक धावा करत मोठा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियन संघालाही ही कामगिरी करता आलेली नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5व्यांदा टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 200 हून अधिक धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघाला श्रीलंकेविरुद्ध केवळ दोनदा ही कामगिरी करता आली आहे. (हे देखील वाचा: AFG vs NZ Test Match Noida: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नोएडा येथे खेळवला जाणार कसोटी सामना, वेळापत्रक जाहीर)
श्रीलंकेविरुद्ध 200+ ची सर्वोच्च धावसंख्या
1. टीम इंडिया- 5 वेळा
2. ऑस्ट्रेलिया- 2 वेळा
3. बांगलादेश- 2 वेळा
4. अफगाणिस्तान- 1 वेळ
रियान परागने घेतल्या तीन विकेट
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला श्रीलंकाचा संघ 19.2 षटकात गारद झाला. श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकाने 79 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-20 सामना उद्या संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.