विजय शंकरने केला साखरपुडा (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी 13 व्या आवृत्तीसाठी संघ संयुक्त अरब अमिरातीसाठी (युएई) रवाना होत आहेत. या दरम्यान, दोन भारतीय खेळाडूंनी आपला साखरपुडा जाहीर केला. अलीकडेच युजवेंद्र सिंह चहलने धनश्री वर्मासोबत साखरपुड्याची घोषणा केली आणि आता भारतीय अष्टपैलू विजय शंकरनेही आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आयपीएलसाठी युएईला जाण्यापूर्वीच विजय शंकरने साखरपुडा केला आहे. टीम इंडियाचा (Indian Team) अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shakar) लवकरच सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळण्यासाठी युएईला रवाना होणार आहे. या अगोदरच त्याने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आणि ही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. विजय शंकरने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंवर सहकारी क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या.

विजय शंकरने गुरुवारी चाहत्यांना आपल्या साखरपुड्याबद्दल माहिती दिली. त्याने वैशाली विश्वेशनरणशी (Vaishali Visweswaran) साखरपुडा केला. विजयने आपल्या मंगेतरसमवेत इंस्टाग्रामवर या खास क्षणांचे दोन फोटो शेअर केली. या फोटोंमध्ये वैशाली एका लेहेंगामध्ये दिसली आहे, तर दुसर्‍या फोटोमध्ये दोघांनीही पारंपारिक कपडे परिधान केले. विजय आणि वैशालीच्या खास क्षणांचे हे फोटो पाहा:

विजय आणि वैशाली

 

View this post on Instagram

 

💍 PC - @ne_pictures_wedding

A post shared by Vijay Shankar (@vijay_41) on

सुंदर

विजय-वैशालीचा साखरपुडा

गोड जोडपं

मागील वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या विश्वचषक 2019 मध्ये विजय शंकर भारतीय संघाचा एक भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो स्पर्धेच्या मध्यातून बाहेर पडावे लागले आणि त्यानंतर पुन्हा त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. 2018 कोलंबो येथे श्रीलंकाविरुद्ध विजयने टी-20 डेब्यू केले. आणि एका वर्षा नंतर, त्याने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही.