Indian Women National Cricket Team vs Sri Lanka Women National Cricket Team, ICC Women's T20 World Cup, 2024 12th Match: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 12 वा सामना आज 9 ऑक्टोबर रोजी भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधला हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात काही खास नव्हती. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. तर श्रीलंकेचे नेतृत्व चामरी अथापथु यांच्या खांद्यावर आहे. (हे देखील वाचा: IND W vs SL W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: T20 विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात आज होणार रोमांचक सामना, थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहता येणार, जाणून घ्या)
टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन
टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत पाकिस्तानचा 6 विकेटने पराभव केला. अशा परिस्थितीत टीम इंडिया आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या स्पर्धेत दुसरा विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर टीम इंडियाला पराभूत करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदविण्यावर असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
हेड टू हेड आकडेवारी
भारतीय महिला आणि श्रीलंका महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यावेळी टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. टीम इंडियाने 25 पैकी 19 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेला केवळ 5 मध्ये विजय मिळाला आहे. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. महिला टी-20 विश्वचषकात भारताचे श्रीलंकेवर वर्चस्व आहे. टी-20 विश्वचषकात टीम इंडिया आणि श्रीलंका पाच वेळा भिडले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने 4 सामने जिंकले आहेत. तर 2014 च्या मोसमात श्रीलंकेने फक्त एकच सामना जिंकला होता.
आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
टीम इंडियाची स्फोटक सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाला आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत 500 धावा पूर्ण करण्यासाठी 32 धावांची गरज आहे.
टीम इंडियाची स्फोटक सलामीवीर फलंदाज शफाली वर्माला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 18 धावांची गरज आहे.
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 धावा पूर्ण करण्यासाठी 30 धावांची गरज आहे.
टीम इंडियाची अनुभवी गोलंदाज रेणुका सिंग टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचे 50 सामने खेळण्यापासून एका सामन्याच्या अंतरावर आहे.
टीम इंडियाची घातक अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळी घेण्यासाठी 1 विकेटची गरज आहे.
श्रीलंकेचा स्टार फलंदाज हर्षिता समरविक्रमाला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1500 धावा पूर्ण करण्यासाठी 7 धावांची गरज आहे.
श्रीलंकेचा कर्णधार चामारी अथापथुला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळी पूर्ण करण्यासाठी 4 बळींची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेची स्टार फलंदाज कविशा दिलहरीला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 27 धावांची गरज आहे.
श्रीलंकेची स्टार फलंदाज निलाक्षिका डी सिल्वा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचे 100 सामने खेळण्यापासून फक्त 1 सामना दूर आहे.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, आशा शोभना, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.
श्रीलंका: चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, कविशा दिलहारी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, उदेशिका प्रबोधनी, इनोका रानावेरा.