
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टॉस जिंकून कर्णधार विराट कोहली याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. हनुमा विहारी (Hanuma Vihari) याला प्लेयिंग इलेव्हन मधून वगळण्यात आले आहे तर, उमेश यादव Umesh Yadav) याला संधी मिळाली आहे. याचाच अर्थ, मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा भारतासाठी डावाची सुरुवात करतील. दोन्ही फलंदाजांनी यापूर्वी पहिल्या मॅचमध्ये शानदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड भागीदारी नोंदवली होती. रोहितने पहिल्या टेस्टमध्ये सलामीला येत दोन्ही डावात शतक केले होते. रोहितसह मयंकने देखील घरच्या मैदानावरील पहिल्या मॅचमध्ये प्रभावी खेळी करत पहिल्या डावात टेस्ट करिअरमधील पहिले दुहेरी शतक केले. पण दुसऱ्या डावात मात्र मयंकला जास्त धावा करता आल्या नाही. (IND vs SA 2nd Test Match 2019 Day 1 Live Score Updates: आजपासून सुरु होणार दुसरा टेस्ट)
विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. दुसरीकडे, आजच्या मॅचसाठी आफ्रिकी संघात काही बडा करण्यात आले आहेत.
असा आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा प्लेयिंग इलेव्हन:
टीम इंडिया: मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा.
दक्षिण आफ्रिका: डीन एल्गार, एडन मार्क्राम, थेयूनिस डी ब्रूयन, टेंबा बावुमा, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, सेनुरान मुथुसामी, वर्नोन फिलेंडर, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे.