Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago
Live

IND 273/3 in 82.1 Overs | IND vs SA 2nd Test Match 2019 Day 1 Live Score Updates: कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण, खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला

क्रिकेट Priyanka Vartak | Oct 10, 2019 04:45 PM IST
A+
A-
10 Oct, 16:45 (IST)

पहिल्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशमुळे 4.5 ओव्हर लवकर संपला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 273 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे 18 आणि कर्णधार विराट कोहली 63 धावा करून क्रीजवर उपस्थित होते.

10 Oct, 16:25 (IST)

फिलँडरच्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर भारतीय कर्णधार विराट कोहलीने चौकार ठोकला आणि त्याचे 23 वे अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने 91 चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. अजिंक्य रहाणे 63 चेंडूत 14 धावा केल्या आहेत. 

10 Oct, 15:16 (IST)

भारताला तिसरा धक्का बसला. मयंक अग्रवाल शतकांसह बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला भडकावले. अग्रवालने आपल्या डावात 16 चौकार आणि 2 षटकार लगावले आणि 108 धावा केल्या. अग्रवालने भारतात दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याने दोन्हीमध्ये शतके ठोकली आहेत. विशाखापट्टणम कसोटीत त्याने 215 धावा केल्या होत्या. कगिसो रबाडाने त्याला माघारी धाडले. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत 3 गडी बाद केले असून कगिसो रबाडा याला तिन्ही यश मिळाले.

10 Oct, 14:55 (IST)

पुणे टेस्‍टच्या पहिल्या दिवशी सलामीवीर मयंक अग्रवाल याने दुसरे शतक केले. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट सामन्यातील मयंकचे हे सलग दुसरे शतक आहे. 

10 Oct, 14:22 (IST)

पुणे टेस्टच्या पहिल्या दिवशी चहा घेतला गेला आहे. दिवसाच्या दुसर्‍या ब्रेकपर्यंत भारताने 2 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल 86 धावा काढून अजूनही मजबूत स्थितीत आहे. त्याच्यासोबत कर्णधार विराट कोहली देखील आहे, ज्याने अद्याप खाते उघडले नाही.

10 Oct, 14:03 (IST)

टीम इंडियाला दुसरा झटका लागला आहे. अर्धशतक करत चेतेश्वर पुजारा 58 धावांवर बाद झाला. पुजाराला कगिसो रबाडाने माघारी धाडले. आतापर्यंत भारताचे दोन्ही गडी रबाडाने बाद केले आहेत. दुसरीकडे, मयंक अग्रवाल हळू-हळू आपल्या दुसऱ्या शतकाच्या जवळ पोहचत आहे. 

10 Oct, 14:01 (IST)

मयंक अग्रवाल नंतर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या चेतेश्वर पुजारानेदेखील अर्धशतक पूर्ण केले आहे. यासह भारताने 150 धावांचा टप्पा ओलांडला. 

10 Oct, 13:53 (IST)

मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसर्‍या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, मयंकने चौकार ठोकत भागीदारीचे शतक पूर्ण केले. याआधी मयंकने चौथे अर्धशतक पूर्ण केले. 

10 Oct, 12:48 (IST)

टीम इंडियाचा सलामीवीर मयंक अग्रवाल याने टेस्ट कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात अश्विनने 112 चेंडूत अर्धशतक केले. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यावर मयंकने चेतेश्वर पुजाराच्या साथीने भारताचा डाव सावरला. अग्रवालने 112 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 50 धावांचा टप्पा ओलांडला.

10 Oct, 11:54 (IST)

पुणे कसोटीत लंचपर्यंत भारतीय क्रिकेट संघ मजबूत स्थितीत होता. टॉस जिंकून फलंदाजी करताना भारताने लंचपर्यंत 1 विकेट गमावून 77 धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी नाबाद 34 आणि 19 धावांवर खेळत आहे. 

Load More

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात आजपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये कसोटी मालिकेचा दुसरा सामना सुरु होणार आहे. भारताने पहिली कसोटी 203 धावांनी जिंकली. भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या मॅचमध्ये प्रथमच टेस्ट मालिकेत भारतासाठी डावाची सुरुवात केली आणि दोन्ही डावात शतक झळकावले. पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने 1-0 अशी अगदी मिळवली आहे. त्यामुळे पुणे टेस्ट जिंकत भारत मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकी संघ मालिकेत बनून राहण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी, दोन्ही संघात टी-20 मालिका खेळण्यात आली होती आणि ती 1-1 ने बरोबरीत राहिली होती. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात झाली आहे. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. दक्षिण आफ्रिकेने टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात भारताविरुद्ध केली आणि पहिल्याच सामन्यात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

विशाखापट्टणम कसोटीत भारताने चांगली कामगिरी केली. भारताकडून आर अश्विन याने पहिल्या डावात सात गडी बाद केले तर दुसर्‍या डावात मोहम्मद शमी याने पाच गडी बाद केले. रवींद्र जडेजा याने देखील दोंघांना चांगली साथ दिली. दुसऱ्या मॅचमध्ये देखील या गोलंदाजांकडून प्रभावी खेळीची अपेक्षा आहे. पहिल्या टेस्टमध्ये आफ्रिकी संघाने  चांगला संघर्ष केला परंतु सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकता आले नाही. पहिल्या मॅचमध्ये रोहितने कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून केलेली सुरुवात कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचा सोबती मयंक अग्रवाल यांच्यासह पुण्यातही संघाला भक्कम सुरुवात करून त्याची देण्याची इच्छा असेल.

असा आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकी संघ:

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.

दक्षिण आफ्रिका: फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), थेयुनिस डे बू्रयन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), डीन एल्गर, जुबायर हम्जा, केशव महाराज, एडिन मार्कराम, सेनुरान मुतुसामी, लुंगी नगिदी, एनरिक नोर्टजे, वार्नोन फिलेंडर, डेन पीट, कागिसो रबादा, रुडी सेकंड.


Show Full Article Share Now