India vs England Series 2021: अतिरिक्त काही दिवस विश्रांती मिळाल्याने टीम इंडिया (Team India) खेळाडू इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी पुन्हा तंदुरुत होत आहेत. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत अजून एक सामना खेळायचा असून सलामी फलंदाज मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि टीम इंडियाच्या "माफिया गँग"ची चाहत्यांना ओळख करुन दिली. रविचंद्रन अश्विन आणि मयंकशिवाय फोटोत कर्णधार विराट कोहली, केएल राहुल, फलंदाजी प्रशिक्षक आर श्रीधर आदी देखील दिसत आहेत. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना मयंकने कॅप्शनमध्ये लिहिले की,"द माफिया गँग, रविचंद्रन अश्विन- मध्यस्थ. #bubblelife #indiancricketteam". अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना दोन दिवसात संपुष्टात आला ज्यात यजमान टीम इंडियाने 10 विकेटने विजय मिळविला आणि चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. (IND vs ENG 4th Test: चौथ्या अहमदाबाद टेस्टपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची माघार, हे आहे कारण)
अहमदाबादच्या मोटेरा येथील या स्टेडियमवर चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून खेळला जाणार आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे खेळाडूंना जैव-सुरक्षित बबलमध्ये राहण्यास भाग पाडले आहे ज्यामुळे त्यांना एकमेकांसह अधिक वेळ घालवण्याची संधी मिळत आहे. चौथ्या कसोटीपूर्वी अश्विनने आभासी पत्रकार परिषदेदरम्यान खुलासा केला की त्याच्या आसपासचे कुटूंबियांशिवाय बायो-बबल्समध्ये राहणे फार कठीण आहे. अश्विन म्हणाला की इंडियन प्रीमियर लीग 2020 आणि संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान त्याचे कुटुंबीय तिथे होते. शिवाय, बायो-बबलमध्ये अधिक वेळ घालविल्यामुळे खेळाडूंमधील मैत्री आणखी चांगली झाली आहे, असेही त्याने म्हणाले.
View this post on Instagram
“मला वाटते की त्यांच्याशिवाय कठीण असू शकते. होय, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात हॉटेलची मोकळी जागा आहे. आमच्याकडे आमचे स्वतःचे मनोरंजन क्षेत्र आहे. आमचे बॉण्ड अधिक चांगले झाले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बायो-बबलमुळे खेळाडू नेहमीपेक्षा अधिक एकत्र येत आहेत. मला असे वाटते की टीम बॉन्डिंग चांगली झाली आहे,” तो म्हणाला. चौथ्या आणि मालिकेच्या अंतिम कसोटी सामन्यात यजमान टीम इंडिया 2-1च्या आघाडीसह मैदानात उतरेल. चेन्नई येथे खेळलेला पहिला कसोटी सामना पाहुण्या संघाने जिंकल्यानंतर, यजमान संघाने दुसरा आणि तिसरा सामना आपल्या नावावर केला. सध्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टीच्या सभोवताली विवाद होत असताना, चौथ्या सामन्यातील विकेट फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.