IND vs ENG 4th Test: चौथ्या अहमदाबाद टेस्टपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज Jasprit Bumrah याची माघार, हे आहे कारण
जसप्रीत बुमराह (Photo Credits: Getty Images)

IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नवनिर्मित नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध (England) होणाऱ्या मालिकेच्या चौथ्या आणि अंतिम सामन्यापूर्वी यजमान टीम इंडियासाठी (Team India) मोठी बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चौथ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. बुमराहने बीसीसीआयला (BCCI) चौथ्या कसोटीत न खेळविण्याची विनंती केली होती. त्याने वैयक्तिक कारणामुळे शेवटच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. यामुळे बीसीसीआयने त्याला चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघातून मुक्त करण्यात आले असून त्याच्या जागी अद्याप दुसऱ्या खेळाडूची निवड झालेली नाही. बुमराहने चेन्नई कसोटी सामन्यातून घरह्या मैदानावरील पहिला कसोटी सामना खेळला होता.या सामन्यात टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या वेगवान गोलंदाजाला चेन्नईत दुसर्‍या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती पण पिंक-बॉल कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला. फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवलेल्या सामन्यात बुमराहने 6 ओव्हर गोलंदाजी केली. (IND vs ENG 4th Test 2021: चौथ्या अहमदाबाद टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियामध्ये होऊ शकतात दोन मोठे बदल, या खेळाडूंना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता)

दरम्यान, आता वैयक्तिक कारणास्तव चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतल्यामुळे बुमराहला आता अहमदाबाद येथे 12 मार्चपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अतिरिक्त विश्रांती मिळेल. मात्र, 23 मार्चपासून पुण्यात खेळल्या जाणाऱ्या वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला निवडले जाईल का हे पाहणे बाकी आहे. बुमराहला कोणत्या वैयक्तिक कारणामुळे संघातून माघार घ्यायला भाग पाडले हे अद्याप समजू शकलेले नाही परंतु मोहम्मद सिराजच्या रूपाने बुमराहच्या जागी भारताला दर्जेदार बदली गोलंदाज मिळाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शिवाय, आतापर्यंत कसोटी मालिकेतील विकेटदेखील 'रँक टर्नर्स' असल्याने वेगवान गोलंदाजांना करण्यासाठी खास राहिले नाही चौथा कसोटी सामना देखील त्याच मैदानावर खेळला जाणार असल्याने त्या सामन्यात देखील फिरकीपटूंचेच वर्चस्व गाजवतील असे दिसत आहे.

चौथ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.