India vs County XI Tour Match: सराव सामन्यादरम्यान केएल राहुलच्या देशभक्तीच्या ‘या’ कृतीने जिंकले नेटकऱ्यांची मने (Watch Video)
केएल राहुलच्या देशभक्ती (Photo Credit: Twitter)

India vs County XI Tour Match: काउंटी सेलेक्ट इलेव्हन (County Select XI) विरुद्ध तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामना खेळत टीम इंडिया (Team India) इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे. विविध कारणांमुळे भारत त्यांच्या पहिल्या पसंतीच्या खेळाडूंविना खेळत आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचा उप अजिंक्य रहाणे तंदुरुस्तीच्या मुद्द्यांमुळे बाहेर पडले आहेत, तर संघ व्यवस्थापनाने आर अश्विनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. रिषभ पंत आणि रिद्धिमान साहा देखील सराव सामन्यासाठी उपलब्ध नव्हते. अशास्थितीत केएल राहुलला (KL Rahul) प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेटकिपर-फलंदाजाची जबाबदार देण्यात आली. 2020 मध्ये राहुल हा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये भारताचा पहिला पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज होता. (IND vs ENG 2021: टीम इंडियाला मोठा धक्का, शुभमन पाठोपाठ ‘या’ वेगवान गोलंदाजाच्याही इंग्लंड दौऱ्यातून एक्सिटची शक्यता)

नाबाद शतक झळकावत राहुलने आतापर्यंतच्या संधीचा सर्वाधिक उपयोग केला. राहुल आपल्या शतकाने प्रसिद्धी मिळवत असताना मैदानात फलंदाजी दरम्यान त्याच्या देशभक्तीच्या कृतीबद्दलही त्याचे कौतुक होत आहे. एका ओव्हर दरम्यान जेव्हा तो आपले ग्लोव्ह्ज समायोजित करीत होते तेव्हा राहुलची भारतीय कसोटी कॅप जमिनीवर पडली. 29 वर्षीय राहुलने कसोटी कॅपबद्दल अत्यंत आदर दर्शवला आणि उचलल्यावर क्रिकेट गिअरला (Cricket Gear) किस केले. राहुलच्या देशभक्तीच्या हावभावाचा व्हिडिओ खाली पाहा...

दरम्यान, राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 301 धावांपर्यंत मजल मारली. तसेच सराव सामन्यात राहुलच्या शतकाने त्याला सलामी जागेसाठी मयंक अग्रवालच्या पुढे नेऊन उभे केले आहे. मयंक पहिल्या डावात 35 चेंडूत 28 धावाच करू शकला. पुढच्या आठवड्यात भारताच्या इंट्रा-स्क्वॉड सराव सामन्यादरम्यान रोहित शर्माचा सलामी जोडीदार कोण असेल याबाबत चित्र स्पष्ट होईल. विकेटकीपर म्हणून रिषभ पंत रिद्धिमान साहाच्या पुढे आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिका 4 ऑगस्ट रोजी नॉटिंघॅम येथे सुरु होणार आहे. दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल. तिसरी टेस्ट मॅच 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान लीड्स आणि चौथी टेस्ट मॅच 2 येते 6 सप्टेंबर दरम्यान लंडनच्या ओवल मैदानात होईल. मालिकेचा अखेरचा सामना 10 सप्टेंबर रोजी मॅन्चेस्टरमध्ये होणार आहे.