कोलकाता येथे भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात खेळल्या जाणार्या डे-नाईट कसोटी सामन्यावेळी, पडणारे 'दव' लक्षात घेता वेळेत बदल करण्यात आले आहेत. भारतात हिवाळ्यामध्ये संध्याकाळी दव मोठ्या प्रमाणात पडतात आणि याचा परिणाम खेळावर होतो. हे लक्षात घेता बीसीसीआयला (BCCI) बंगाल क्रिकेट असोसिएशनने (BCA) सामन्याची वेळ बदलण्याची विनंती केली होती. बीसीएची ही मागणी बोर्डाने मान्य केली असून, आता हा सामना इडन गार्डन्सवर (Eden Gardens) दिवसाच्या एक वाजल्यापासून सुरू होईल आणि रात्री आठ वाजेपर्यंत खेळला जाईल. आयएएनएसने याबाबत माहिती दिली आहे.
कोलकाता येथे 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत बांगलादेशविरुद्ध भारत पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र आता खेळाची वेळ बदलण्यात आल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिवाळ्यात पडणारे दव लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. दवामुळे सामना खेळताना बॉल खूप ओला होईल आणि यामुळे खेळाडूंना त्रास होऊ शकतो. याचमुळे बोर्डाने बीसीएच विनंती मान्य केली आहे. आता दुसरा कसोटी सामना एक वाजता सुरू होईल. (हेही वाचा: ऑलिम्पिक पदकविजेतांचा सन्मान, शालेय मुलांना मोफत Pass; भारताची पहिली डे/नाईट टेस्ट अविस्मरणीय करण्यासाठी BCCI सज्ज)
खेळाचे पहिले सत्र दुपारी 1 ते दुपारी 3 या वेळेत चालेल. यानंतर, दुसरे सत्र 3.40 ते 5.40 आणि त्यानंतर तिसरे सत्र संध्याकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत चालतील. अधिकाऱ्यांनी आयएएनएसला ही माहिती दिली आहे. संध्याकाळच्या दवामुळे रात्री 8 नन्तर बॉल जास्त ओळ होण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम खेळावर होऊ शकतो. सुरुवातीच्या तीन दिवसांत हा डे-नाईट टेस्ट सामना पाहायसाठी साधारण 50,000 प्रेक्षक उपस्थित राहू शकतील असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.