भारत आणि बांग्लादेशमधील ईडन गार्डन्सवरील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी बांग्लादेशला पहिल्या डावात 106 ऑल आऊट करत भारताने पहिल्या डावात फलंदाजी केली आणि दिवसाखेर 3 गडी गमावून 174 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतक केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट नाबाद 59 आणि अजिंक्य रहाणे नाबाद 23 धावांवर खेळत होते. पुजारा 55 धावांवर कॅच आऊट झाला. 

इबादत हुसेनच्या चेंडूवर कोहलीने मिडविकेटकडे चौकार ठोकला आणि यासह त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 76 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

40 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर इबादत हुसेनने चेतेश्वर पुजाराला बाद केले आणि भारताला तिसरा धक्का दिला. दुसर्‍या स्लिपवर पुजारा शादमान इस्लाम याच्या हाती झेलबाद झाला. पुजाराने 105 चेंडूत 55 धावा केल्या.

पहिले दोन विकेट लवकर गमावल्यावर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. दोंघांनी 87 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला 100 धावांचा टप्पा गाठून दिला. यादरम्यान, पुजाराने 93 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 

भारताने बांग्लादेशवे पहिल्या डावात 10 धावांची अगदी मिळवली आहे. यादरम्यान, कोहलीने तैजुल इस्लामचा चेंडू चेंडू मिडऑनच्या दिशेने खेळला आणि एक धाव घेतली. यासह, त्याना कर्णधार म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. शिवाय, ही कामगिरी करणारा विराट सर्वात जलद कर्णधार बनला आहे. विराटने 53 डावांमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या. 

25 वी ओव्हर टाकण्यासाठी तैजुल इस्लाम बॉलिंगसाठी आला आणि त्याच्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीने चौकार मारत पहिल्या डावात भारताच्या 100 धावा पूर्ण केल्या. टीम इंडिया बांग्लादेशच्या पहिल्या डावापासून अवघ्या पाच धावा दूर आहे. 

मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांच्या सुरुवातीच्या विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा डाव सावरत आहेत. दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असून असून बांगलादेशच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 18 धावांनी मागे आहे.

टी ब्रेकनंतर भारताला मोठा झटका लागला आहे. इबादत हुसेन ने रोहित शर्मा याला 21 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट करत माघारी धाडले. अंपायरने आऊट दिल्यावर रोहितने दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या पुजारासह चौकशी करत रिव्यू घेतला. पण, थर्ड अंपायरने अंपायर्स कॉलचा निकाल दिला. 

टी ब्रेक झाला असून भारताने एका विकेट गमावून 35 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी 44 चेंडूंत नऊ धावांची भागीदारी केली. दुसर्‍या सत्रात मयंक अग्रवाल याच्या रूपात भारताला एकमेव धक्का बसला.

कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात मयंक अग्रवाल स्वस्त बाद झाला. त्याने अवघ्या 14 धावा केल्या आणि मेहंदी हसनला अल अमीनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 21 चेंडूंचा सामना केला.

Load More

बर्‍याच वर्षांच्या संकोचानंतर भारतीय संघ (Indian Team) पिंक बॉलने डे-नाईट टेस्ट सामना खेळण्यास सज्ज आहे. टीम इंडिया आजपासून बांग्लादेश संघाविरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर पहिला पिंक बॉल टेस्ट सामना खेळणार आहे. दोन्ही पहिल्यांदा गुलाबी चेंडूने टेस्ट खेळणार आहे. भारतात प्रथमच ही कसोटी गुलाबी बॉलने (Pink Ball) खेळली जात आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा 12 वा डे-नाईट कसोटी सामना असेल. या सामन्यातही कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा वरचष्मा आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवत टीम इंडिया 2 सामन्यांच्या मालिकेत क्लीन-स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघांदरम्यान खेळलेला सामना ऐतिहासिक ठरणार आहे. पहिला डे-नाईट कसोटी सामना 27 नोव्हेंबर 2015 मध्ये अ‍ॅडिलेड ओव्हल मैदानावर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळला गेला होता. आजवर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, झिम्बाब्वे या 8 देशांनी आतापर्यंत डे-नाईट टेस्ट खेळली आहेत. डिसेंबर 2018 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्यामयंक अग्रवाल याने मागील तीन टेस्ट सामन्यांमध्ये शानदार प्रदर्शन केले आहेत. त्यामुळे यंदाच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

असा आहे भारत आणि बांग्लादेशचा टेस्ट संघ:

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, कुलदीप यादव आणि उमेश यादव.

टीम बांग्लादेश: मोमीनुल हक (कॅप्टन), अल-अमीन-हुसेन, इम्रुल कायस, शादमन इस्लाम, सैफ हसन, महमूदुल्ला, मोसद्देक हुसेन, मेहेदी हसन, लिटन दास, मुश्फिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, तैजुल इस्लाम, नईम हसन, मुस्तफिजुर रहमान आणि इबादत हुसेन.