कोलकातामधील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. बांग्लादेशने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 6 विकेट गमावले आहेत. भारताने पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित केल्यावर बांग्लादेशने दुसऱ्या डावात 6 बाद 152 धावा केल्या आहेत. मुश्तफिझूर रहीम नाबाद 59 धावांवर खेळत आहे.
BAN 152/6 in 32.3 Overs, (IND 347/9dec) | IND vs BAN 2nd Test Day 2 Live Score Updates: टीम इंडियाला विजयासाठी 4 विकेटची गरज, बांग्लादेश अजूनही 89 धावांनी पिछाडीवर
इशांत शर्मा (Ishant Sharma) याच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने ऐतिहासिक डे-नाईट कसोटीच्या पहिल्या दवशी बांग्लादेशला 106 धावांवर ऑल आऊट केले. आणि नंतर पहिल्या डावात फलंदाजीला येत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या अर्धशतकी खेळीने पहिल्या दिवसाखेर भारताने 68 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या दिवशी बांग्लादेश (Bangladesh) वर मजबूत पकड बनवून ठेवली आहे आणि आता दुसऱ्या दिवशी भारतीय संघ (Indian Team) मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या कसोटी सामन्यात तीन दिवसांत डावाच्या फरकाने विजय मिळविणार्या भारताने कोलकातामधील पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावून 174 धावा केल्या आहेत. विराट नाबाद 59 आणि अजिंक्य रहाणे नाबाद23 धावांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु करतील. यासह विराट आज त्याचे शतक देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या दिवशी टॉस जिंकून बांग्लादेशचा कर्णधार मोमिनुल हक याने फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्याचे कोणते फलंदाजी तो निर्णय योग्य सिद्ध करू शकले नाही. बांग्लादेशचा पहिला डाव केवळ 30.3 ओव्हरमधेच संपुष्टात आला. त्यांचे फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. लिटन दास याच्याव्यतिरिक्त शादमान इस्लाम याने 29 आणि नईम हसन याने 19 धावा केल्या. भारताकडून 12 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 5 गडी बाद केले. मागील 12 वर्षात पहिल्यांदाच इशांतने भारतात पाच विकेट घेतल्या. उमेश यादव यानेही त्याच्या वेगवान गोलंदाजीने बांग्लादेशी फलंदाजांना खूप त्रास दिला आणि सात ओव्हरमध्ये 29 धावा देऊन तीन गडी बाद केले, तर मोहम्मद शमी याने घातक गोलंदाजी करत 36 धावा देऊन दोन विकेट घेतले. शमीच्या दोन धोकादायक बाऊन्सरने लिटन दासला 24 धावांवर आणि नईम हसनला रिटायर्ड हर्ट होऊन परतावे लागले. त्यांच्या जागी दोन फलंदाजांना कन्सक्शन सबस्टिट्यूट म्हणून बोलावले गेले. भारताच्या डे-नाईट टेस्टची बरीच चर्चा होत होती. आणि सुरुवातीला भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सामन्यावर संघाची पकड आणखी घट्ट केली.