India Vs Australia 3rd Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीअखेर भारताने 215 धावा केल्या असून भारताला 2 विकेट्स गमवाव्या लागल्या आहेत. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीवीर मयांक अग्रवालने (Mayank Agarwal) 76 धावा करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. हनुमा विहारी (Hanuma Vihari) मात्र 8 धावांत माघारी परतला. तर 76 धावा करुन मयांक बाद झाला. भारताचे दोन बळी घेण्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला यश आले. 1947 नंतर पर्दापणातच अर्धशतकी खेळी करणार Mayank Agarwal ठरला पहिला भारतीय खेळाडू
त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा 68 धावांची दमदार खेळी करत नाबाद राहिला आहे. तर कर्णधार विराट कोहलीही 47 धावांवर नाबाद आहे. मेलबर्न टेस्ट मॅचसाठी 11 खेळाडूंसह भारतीय संघाची घोषणा, Mayank Agarwal चा संघात समावेश
चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामने झाले असून दोघी संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत.