India Vs Australia 3rd Test : 1947 नंतर पर्दापणातच अर्धशतकी खेळी करणार Mayank Agarwal ठरला पहिला भारतीय खेळाडू
मयांक अग्रवाल (Photo Credits: Getty Images)

India Vs Australia 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मयांक अग्रवालने (Mayank Agarwal) नाबाद अर्धशतक झळकावले आहे. पदार्पणातच मयांकने दमदार खेळ करत अनेकांची मने जिंकली आहेत. असे करणार मयांक हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी 1947 साली दत्तू फाडकर (Dattu Phadkar) यांनी ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणात अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर पहिल्यांदाच मयांकने पदार्पणात जबरदस्त खेळी केली आहे. मेलबर्न टेस्ट मॅचसाठी 11 खेळाडूंसह भारतीय संघाची घोषणा, Mayank Agarwal चा संघात समावेश

मयांक हा 27 वर्षांचा असून दत्तू फाडकर यांच्यानंतर अर्धशतक झळकवणारा पहिला खेळाडू ठरला आहे. फक्त ऑस्ट्रेलियातच नाहीत तर मयांकने इंग्लंड, दक्षिण आफ्रीका आणि न्यूझीलंडच्या कसोटी सामन्यांतही दमदार खेळी केली आहे.

एल राहुल, मुरली विजय यांच्या वाईट कामगिरीमुळे आणि पृथ्वी शॉ जखमी झाल्यामुळे नाही तर मयांकच्या दमदार खेळामुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे. मयांक अग्रवालने गेल्या रणजी सीजनमध्ये 13 मॅचेसमध्ये 1160 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर मयांक अग्रवालने 'विजय हजारे ट्रॉफी 2018' मध्ये 8 सामन्यात 723 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामने झाले असून दोघी संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली असून मयांक अग्रवालच्या दमदार अर्धशतकामुळे भारताची चांगली सुरुवात झाली आहे.