India vs Australia 2nd Test : ऑस्ट्रेलियन संघाची भारतावर 147 धावांनी मात, मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी
Australia beat India by 146 runs (Photo Credits : Twitter)

India vs Australia 2nd Test : पर्थच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघाने भारताला विजयासाठी 287 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताचे 5 फलंदाज 112 धावांवर आऊट झाल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर 147 धावांनी मात करत मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी मिळवली आहे. India vs Australia: पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया टेस्ट दौऱ्यामधून बाहेर, मयंक अग्रवाल याला भारतीय संघामध्ये स्थान

ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 326 धावांवर पूर्ण झाला. त्यानंतर भारतीय संघाची सुरूवात डळमळीत झाली. भारताचा पहिला डाव 283 धावांमध्ये संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 243 धावांवर संपला. भारतीय फलंदाज मोहम्मद शमी याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या 6 विकेट्स घेतल्याने त्यांना रोखणं शक्य झाले. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी होती. चौथ्या दिवसअखेर भारताने 5 बाद 112 धावा केल्या. भारताला विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य होते. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर भारताला धावांचा टप्पा पूर्ण करणं कठीण झाले होते. Mohammed Shami ने 15 वर्षांनतर ऑस्ट्रेलियात केला हा पराक्रम, Sachin Tendulkar नेही केलं ट्विटरच्या माध्यमातून कौतुक

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या स्टेडियमवर 26 डिसेंबरपासून रंगणार आहे. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या 1-1 असा टाय झाल्याने पुढील कसोटी सामना हा निर्णायक ठरणार आहे.