India vs Australia 2nd Test :  Mohammed Shami ने 15 वर्षांनतर ऑस्ट्रेलियात केला हा पराक्रम, Sachin Tendulkar नेही केलं ट्विटरच्या माध्यमातून कौतुक
Mohammed Shami and Sachin Tendulkar (Photo credits : Twitter)

India vs Australia 2nd Test : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सुरू असलेल्या दुसर्‍‍या कसोटी सामन्यामध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टी ब्रेक पर्यंत 4 बाद 192 अशा मजबूत स्थितीमध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) दमदार गोलंदाजीने घाबरवून सोडलं आहे. शमीने ऑस्ट्रेलियन संघाच्या 4 विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलिया सध्या 9 बाद 207 अशा स्थितीमध्ये आला  आणि  भारताला विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य आहे.

मोहम्मद शमीचा दमदार परफॉर्मन्स

मोहम्माद शमीने  प्रथमच त्याच्या कारकिर्दीमध्ये 6 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये पंधरा वर्षांनंतर प्रथमच एखाद्या खेळाडूने असा विक्रम केला आहे. मोहम्मद शमी पूर्वी अजित आगरकर या मराठमोळ्या खेळाडूने 2003 साली 41 धावांमध्ये 6 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. अजित आगरकर (Ajit Agarkar) नंतर आता ऑस्ट्रेलियामध्ये सहा विकेट्स घेणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर यानेदेखील मोहम्मदच्या या दमदार कामगिरीचं ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केल आहे.

2018 या वर्षामध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडूदेखील मोहम्मद शमी आहे. शमीने 11 कसोटी सामन्यांमध्ये 44 विकेट्स घेतल्या आहेत.