India vs Australia 3rd Test : मेलबर्न टेस्ट मॅचसाठी 11 खेळाडूंसह भारतीय संघाची घोषणा, Mayank Agarwal चा संघात समावेश
Indian team For Melbourne Test (Photo Credits: Twitter)

India vs Australia 3rd Test : मेलबर्नमध्ये (Melbourne) रंगणाऱ्या तिसऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यासाठी  (Test Match) संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाकडून 11 खेळाडूंची टीम जाहीर करण्यात आली आहे. मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना आराम देत आता संघामध्ये मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal)  या खेळाडूला स्थान देण्यात आलं आहे. तो सलामीवीर म्हणून उतरण्याची शक्यता आहे.  मयांक अग्रवाल मेलबर्न कसोटी सामान्यामधून टेस्ट मॅचमध्ये पदार्पण करणार आहे. सोबतच रोहित शर्मानेही संघात पुनरागमन केलं आहे.आर. अश्विन देखील दुखापतीमधून बाहेर पडलेला नसल्याने त्याच्याऐवजी रविंद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे.

कसा असेल भारतीय संघ ?

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या स्टेडियमवर 26 डिसेंबरपासून रंगणार आहे. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या 1-1 असा टाय झाल्याने हा तिसरा कसोटी सामना हा निर्णायक ठरणार आहे.त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहेत.