Wriddhman Saha Injury: ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, रिद्धिमान साहाला हॅमस्ट्रिंगचे निदान, SRH कर्णधार डेविड वॉर्नरने दिली माहिती
रिद्धिमान साहा (Photo Credit: Getty)

आयपीएलच्या फायनल (IPL Final) सामन्यानंतर टीम इंडिया त्वरित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) रवाना होणार आहे. पण, त्यापूर्वी भारतीय संघाची (Indian Team) डोकेदुखी वाढत असल्याचं दिसत आहे. विकेटकीपर-फलंदाज रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) दुखापत झाली आहे ज्यामुळे त्याच्या कसोटी मालिका खेळण्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आयपीएल (IPL) 2020 च्या क्वालिफायर 2 मध्येही साहा सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होऊ शकला नाही, त्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 डिसेंबर रोजी पहिला कसोटी सामना खेळणार आहे. पण साहाची दुखापत ही कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी मोठा धक्का मानली जात आहे. तसे, कसोटी मालिकेसाठी रिषभ पंतचादेखील भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. जर ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी साहा फिट झाला नाही तर त्याच्या जागी आणखी एक यष्टीरक्षक ऑस्ट्रेलियाला नेला जाऊ शकते. (India Tour of Australia 2020-21: टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, दुखापतीनंतर पुनरागमन करण्यास 'हिटमॅन' तैयार)

आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फलंदाजी करताना साहाला ग्रोईनची दुखापत झाली होती, पण तरीही तो मुंबई इंडियन्सविरुद्ध 14व्या अंतिम अंतिम सामन्यात खेळला. एसआरएचचा कर्णधार डेविड वॉर्नरने रविवारी दिल्लीविरुद्ध क्वालिफायर 2 सामन्यात टॉसदरम्यान साहाच्या दुखापतीची पुष्टी केली आणि म्हटले, "रिद्धिमान साहाकडे हॅमस्ट्रिंग टीअर आहे." मात्र, दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे समजले आहे की जर साहाला ग्रेड 1 टिअर असेल ज्यावर साधारणपणे चार आठवडे विश्रांती आणि पुनर्वसन केले जाते, तर 17 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया येथे जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. आणि जर त्याचा ग्रेड 2 टिअर असेल तर तो ऑस्ट्रेलियाला जाणार नाही कारण त्याला बरे होण्यासाठी किमान दोन महिने लागतील.

दरम्यान, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारही दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन दौर्‍याबाहेर झाले आहेत. भारतीय संघ कसोटी मालिकेपूर्वी 3 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी टी-20 मालिकेने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होईल, तर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेची सुरुवात होईल. भारत-ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेचा पहिला सामना गुलाबी बॉलने खेळला जाईल.