Hardik Pandya And Shivm Dube (Photo Credit - X)

पुणे: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा टी-20 सामना (IND vs ENG 4th T20I 2025) आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात दोन पराभव धक्के लागले. साकिब महमूदने संजू सॅमसन (1) आणि तिलक वर्मा (0) यांना बाद केले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाकिबने सूर्यकुमार यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तिलकनंतर सूर्यकुमारलाही खाते उघडता आले नाही. सलामीवीर अभिषेक शर्मा 19 चेंडूत 29 धावा काढून बाद झाला. रिंकू सिंगने 26 चेंडूत 30 धावा केल्या. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने 30 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज साकिब महमूदने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून साकिब महमूदने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. साकिब महमूद व्यतिरिक्त जेमी ओव्हरटनने 2, ब्रायडन कार्से आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकांत 182 धावा कराव्या लागतील. इंग्लंड संघाला हा सामना जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरी करायची आहे.