India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे.सामन्याला सकाळी 9.30 ला सुरुवात होईल. खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 37.2 षटकांत 4 बाद 158 धावा केल्या आहे. कर्णधार नजमुल हुसेन शांतो (51) आणि शाकिब अल हसन (5) धावा करून खेळत आहे. तसेच टीम इंडियासाठी आर अश्विनने 3 आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली आहे. बांगलादेश अजूनही टीम इंडियापेक्षा 357 धावांनी मागे आहे. टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 6 विकेट्सच्या अपेक्षा आहेत.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचा आनंद तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर मॅचचा सहज घेऊ शकता. हा कसोटी सामना वायाकॉम 18 नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना स्पोर्ट्स 18 चॅनल 1 आणि चॅनल 2 वर पाहू शकता. तसेच हा सामना जिओ सिनेमावर मोबाईलवर पाहता येईल. (हे देखील वाचा: Rishabh Pant Milestone: धोनीच्या बालेकिल्ल्यात 'ऋषभ पंत'ची हवा, शतक ठोकून 'कॅप्टन कूल'च्या विक्रमाशी केली बरोबरी)
Bring 🔛 Day 4 #TeamIndia 6⃣ wickets away from a win in Chennai 👌👌
Live - https://t.co/jV4wK7BgV2#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/aEwyazukbP
— BCCI (@BCCI) September 22, 2024
पंत-गिलचे दमदार शतक
दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारताने दुसरा डाव चार विकेट गमावून 287 धावांवर घोषित केला आहे. यासह भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून शुभमन गिलने 176 चेंडूंत 10 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 119 धावा केल्या. तर, केएल राहुल 22 धावा करून नाबाद राहिला. ऋषभ पंतने 109 धावांची खेळी केली. पंत आणि गिल यांनी चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. यापूर्वी यशस्वी जयस्वाल (10), रोहित शर्मा (5) आणि विराट कोहली (17) शुक्रवारीच बाद झाले. भारताने आज 81/3 धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 206 धावांची भर घालून डाव घोषित केला.
भारताचा पहिला डाव 376 धावांवर संपुष्टात
त्याआधी बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी साठी आलेला भारताचा पहिला डाव 376 धावांवर संपुष्टात आला. भारतासाठी रविचंद्रन अश्विनने 113 धावांची दमदार खेळी केली, रवींद्र जडेजाने 86 धावा आणि यशस्वी जैस्वालने 56 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमूदने सलामी दिली तर तस्किन अहमदनं 3 बळी घेतले.
बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर गारद
याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ 149 धावा करू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, सिराज-जडेजा आणि आकाश दीपने 2-2 विकेट घेतल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 32 धावा केल्या.