![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/rohit-sharma-75-.jpg?width=380&height=214)
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd ODI 2025) आज कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने 44.3 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd ODI 2025: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्माने रचला इतिहास, कर्णधार म्हणून केला 'हा' मोठा पराक्रम)
2ND ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/NReW1eEQtF #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 9, 2025
डकेट-रूटने ठोकले अर्धशतक
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाला चांगली सुरुवात मिळाली. बेन डकेट (65) आणि जो रूट यांनी (69) अर्धशतके झळकावली. त्यानंतर जोस बटलर (34) लियाम लिव्हिंगस्टोनच्या 41 धावांच्या जोरावर इंग्लडने 49.5 षटकात 10 विकेट गमावून 304 धावा केल्या. दुसरीकडे भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीव विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
रोहित शर्माचे स्फोटक शतक
लक्ष्याचा पाठलाग करताना, टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी केली आणि 136 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने 44.3 षटकांत फक्त सहा विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने 119 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, रोहित शर्माने 90 चेंडूत 12 चौकार आणि सात षटकार मारले. रोहित शर्मा व्यतिरिक्त शुभमन गिलने 60 धावा केल्या.
इंग्लंडकडून जेमी ओव्हरटनने घेतल्या दोन विकेट
दुसरीकडे, जेमी ओव्हरटनने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. जेमी ओव्हरटन व्यतिरिक्त, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता खेळला जाईल.