(Photo Credits: Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात आज मॅंचेस्टर (Manchester) च्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर सामना होत आहे. या सामन्यात भारतानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पॉवरप्लेमध्ये 47 धावा करत भारताने एक विकेट गमवलं. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) 18 धावांवर बाद झाला. मात्र, रोहितची विकेट विवादास्पद ठरली आणि त्यामुळे आता डीआरएस (DRS) आणि अंपायरिंगवर प्रश्न उभे केले जात आहे. रोहितच्या विकेटबाबत पुनरावलोकन करण्यासाठी मैदानातील अंपायरने तिसऱ्या अंपायर ला विचारले असल्यास रीप्लेने दर्शविले की बॉलचा पॅडला स्पर्श झाला होता. (India vs West Indies Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs WI मॅच चा LIVE आनंद)

UltraEdge वर एक स्पाइक दिसल्याने ऑन-फील्ड अंपायरचा निर्णय बदलून रोहितला आऊट देण्यात आले. अंपायरचा हा निर्णय रोहित शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्कादायक होता. रोहित शर्मा डोकं हलवत मैदान बाहेर परतला, मात्र त्याच्या चाहत्यांनी मात्र अंपायर धारेवर धरले.

असे दिसते की मायकेल गॉफ तिसर्या अंपायरच्या खुर्चीवरून @ ईसीबी_क्रिकेटसाठी खेळत आहेत!

हा पुन्हा गांजा फुंकून आला आहे

भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, त्यामुळं आज वेस्ट इंडिजला नमवतं विराटसेना सेमीफायनलमध्ये आपले प्रवेश निश्चित करू शकतो. भारताने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला. रोहित बाद झाल्यावर भारताच्या फलंदाजीची मदार ही के. एल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर असणार आहे.