India vs West Indies Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs WI मॅच चा LIVE आनंद

इंग्लंड (England) मध्ये चालू असलेल्या आयसीसी (ICC) विश्वकप यामध्ये आपल्या सलग 4 विजयासह भारतीय संघाची विजयी घौडदौड सुरु आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, त्यामुळं सेमिफायनलचे तिकीट जवळजवळ पक्क झाले आहेत. आज मॅन्चेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानात भारत (India) वेस्ट इंडिज (West Indies) विरोधात खेळणार आहे. भारत-वेस्ट इंडिज मधील सामना बघण्यासाठी हजारो प्रेक्षक मॅन्चेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड ला पोहचले आहे. जे चाहते इंग्लंड ला जाऊन हा सामना बघण्यात असमर्थ आहे ते टीव्ही वर DD Sports वर या सामन्याचा आनंद लुटू शकतात. दरम्यान, देशाचा बहुचर्चित रेडिओ चॅनेल प्रसार भरती स्पोर्ट्स (Prasar Bharti Sports) भारत-वेस्ट इंडिज सामन्याची लाइव कमेंट्री करणार आहे. आपण प्रसार भारती च्या FM 106.40 मेगाहर्ट्ज वर जाऊन या सामन्याची कॉमेंटरी ऐकू शकतात. (IND vs WI: भुवनेश्वर कुमार की मोहम्मद शामी? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने दिले अनपेक्षित पण स्पष्ट उत्तर)

हा भारताचा सहावा सामना आहे. टीम इंडिया ने चार सामन्यात विजय मिळवला आहे तर न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुरीकडे, वेस्ट इंडिज 6 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 4 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. इंडिज सामन्याआधी भारताने ओल्ड ट्रॅफर्ड च्या मैदानावर पाकिस्तान (Pakistan) ला मात दिली होती. गुणतक्त्यात भारत सध्या 9 गुणांसह तिसऱ्या स्थाावर आहे.

यंदाच्या विश्वकप मध्ये भारताच्या गोलंदाजांनी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजयी कामगिरी करण्याचा ते प्रयत्न करतील. भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया (Australia), पाकिस्तान (Pakistan), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) ला पराभूत केलं आहे. इंडिज नंतर भारतच सामना यजमान  बांगलादेश (Bangladesh) शी होणार आहे.