IND vs WI, ICC World Cup 2019: विराट कोहली ने केल्या 'सुपर फास्ट' 20,000 धावा; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा चा मोडला रेकॉर्ड
(Image Credit: AP/PTI Photo)

भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने एक नवीन जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने वेगवान 20 हजार धावा पूर्ण केल्या आहे. याच बरोबर विराटने क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वेस्ट इंडिज चा महान खेळाडू ब्रायन लारा (Brian Lara) ला ही मागे टाकले. 20 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो 12 वा आणि तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) नं 20 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. (IND vs WI मॅचदरम्यान रोहित शर्मा च्या विवादित विकेट वर संतापले Netizens, थर्ड अंपायर ला केले ट्रोल)

क्रिकेटविश्वात सर्वाधिक विश्वविक्रम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होते. मात्र, सचिन निवृत्त झाल्यावर त्याचे काही विश्वविक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोडीत काढले आहेत.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20,000 धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड फक्त सचिन तेंडुलकर चा नाही. सचिन वेस्ट इंडिज (West Indies) च्या ब्रायन लारा (Brian Lara) बरोबर हा रेकॉर्ड शेअर करतो. सचिन आणि लारा ने 453 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळात 20 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तिथेच कोहलीने आजवर 416 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

विराट सध्या आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये टीम इंडियाच नेतृत्व करत आहे. टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. विराटच्या टीमने आतापर्यंत 4 मॅच जिंकल्या आहेत, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये बॅटिंगसोबत बॉलिंगही चांगली होत आहे. दोन्ही संघासाठी आजची मॅच महत्वाची आहे. आजची मॅच जिंकून टीम इंडियन सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित करेल, तर वेस्टइंडिजचा ही मॅच जिंकून आपली अब्रु बचावण्याचा प्रयत्न करणार.