IND vs WI 3rd T20I: एविन लुईस याची शानदार फिल्डिंग, रोहित शर्मा याने षटकारासाठी मारलेला चेंडू पकडण्याच्या प्रयत्नाला Netizens कडून दाद, पाहा हा Video
एविन लुईस (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. दोन्ही संघासाठी आजचा हा सामना महत्वाचा आहे. सध्या दोन्ही संघ 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून वेस्ट इंडिज कर्णधार किरोन पोलार्ड याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, भारताची फलंदाजी पाहता हा निर्णय चुकीचा दिसत आहे. भारतीय सलामीची जोडी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी शतकी भागीदारी करत जोरदार सुरुवात केली आहे.  दोघांमध्ये शतकी भागीदारीही पूर्ण झाली असून दोघांनी आपापले अर्धशतकही पूर्ण केले. रोहितने होम ग्राउंडमध्ये षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. पण, त्याआधी एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात हिटमॅन बाद होता-होता राहिला. रोहित पहिल्या दोन्ही सामन्यात प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता त्यामुळे, आज होम ग्राउंडमध्ये खेळत रोहित ती कसरही पूर्ण करू इच्छित आहे. (IND vs WI 2nd T20I: रोहित शर्मा याने नोंदवला 'षटकारांचा' महा रेकॉर्ड, ‘हा’ पराक्रम करणारा बनला पहिला भारतीय)

रोहितने डीप मिड-विकेटवर सिक्सर लावण्याचा प्रयत्न केला, परंतु सीमारेषेवर उभय असलेल्या एव्हिन लुईस (Evin Lewis) याने एका हाताने झेल पकडला पण आपला तोल जास्त असल्याचे समजताच चेंडू सीमारेषेच्या आत टाकला. लुईसच्या या क्षेत्ररक्षणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लुईसच्या या कृतीमुळे रोहितला 27 धावांवर जीवदान मिळाले. पाहा हा थक्क करणारा व्हिडिओ:

लुईसच्या कॅचवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

एव्हिन लुईसने किती प्रयत्न केले

लुईसचा जादुई प्रयत्न

लुईस काय प्रयत्न करणारा माणसा

लुईस भाऊ वाह मजा आली

भारतीय संघ (Indian Team) आणि वेस्ट इंडीजमधील तीन सामन्यांची टी-20 मालिका रंजक बनली आहे. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. हैदराबाद येथे पहिला टी -20 सामना भारताने जिंकला, तर वेस्ट इंडीजने दुसरा टी -20 जिंकला आणि मालिका बरोबरी साधली. हैदराबाद टी -20 मध्ये भारताने 200 धावांचा यशस्वी पाठलाग केला, परंतु गोलंदाजांनी या सामन्यात निराश केले. दुसर्‍या सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 170 धावांचे आव्हानात्मक धावसंख्या गाठली पण गोलंदाज लक्ष्य राखण्यात अपयश आले.