IND vs WI 3rd ODI: निकोलस पुरन-किरोन पोलार्ड यांचे संघर्षपूर्ण अर्धशतक, वेस्ट इंडिजचे भारताला विजयासाठी 316 धावांचे आव्हान
किरोन पोलार्ड, विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेचा अंतिम सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. यामध्ये वेस्ट इंडिजने पहिले फलंदाजी करत निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 बाद 315 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 316 धावांचे लक्ष्य दिले. भारतीय कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. याच्या प्रत्युत्तरात विंडीज संघ सुरुवातीपासून संघर्ष करताना दिसला. विंडीजकडून निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) यांनी सर्वाधिक धावा केल्या. पूरनने 89, तर पोलार्डने नाबाद 74 धावा केल्या. पोलार्डने या खेळीदरम्यान एकूण 7 षटकार आणि 4 चौकार मारले.  शाई होप 42, रोस्टन चेस 38 आणि शिमरोन हेटमायर यांनी 27 धावांचे योगदान दिले. पोलार्डने पुरनच्या साथीने चांगली भागीदारी करत संघाला आव्हानात्मक धावा करण्यास सहाय्य केले. नवदीप सैनी (Navdeep Saini) याने सर्वाधिक 2, मोहम्मद शमी (Mohammed Shami), शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. या मॅचमध्ये देखील भारताच्या फिल्डिंगने निराश केले. भारत आणि विंडीज संघात 3 सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. (IND vs WI 3rd ODI: शाई होप ने विव्ह रिचर्ड्स, बाबर आझम यांना मागे टाकत नोंदवला विश्व विक्रम, 'ही' कामगिरी करणारा बनला सर्वात जलद विंडीज फलंदाज)

प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यानंतर वेस्ट इंडीजचे सलामी फलंदाज शाई होप आणि इव्हिन लुईस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या 14 षटकांत कोणतीही विकेट न गमावता दोघांनी 56 धावांची भागीदारी केली. मात्र, 15 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात लुइसझेलबाद झाला. जडेजाच्या चेंडूवर लुईस 21 धावांवर सैनीकडे झेलबाद झाला. शमीने होपला बोल्ड करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. शमीने 42 धावांवर होपला बोल्ड केले. सैनीने हेटमायरला वनडे कारकिर्दीचा पहिला बळी बनवला आणि 37 धावांवर कुलदीपने हेटमायरचा झेल पकडला. वेस्ट इंडीजला चौथा धक्का रोस्टन चेस याच्या रूपात लागला. त्याला 48 चेंडूंत 38 धावांवर सैनीने क्लीन बोल्ड केले.

त्यानंतर पुरनने कर्णधार पोलार्डच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये 135 धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. 144 धावांवर 4 गडी बाद झाल्यावर पोलार्ड आणि पुरनने संघाला मुश्किल स्थितीतून काढले. पहिले चार गडी बाद केल्यावर भारतीय गोलंदाज विकेटच्या शोधातच राहिले. कटक मॅचमध्ये भारताने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या मॅचमधून सैनीने आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण केले. त्याला दुखापत झालेल्या दीपक चाहर याच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.