IND vs WI 3rd ODI: शाई होप ने विव्ह रिचर्ड्स, बाबर आझम यांना मागे टाकत नोंदवला विश्व विक्रम, 'ही' कामगिरी करणारा बनला सर्वात जलद विंडीज फलंदाज
शाई होप (Photo Credit: Getty)

रविवारी टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज (West Indies) चा फलंदाज शाई होप (Shai Hope) 3,000 वनडे धावा करणारा विंडीजचा सर्वात वेगवान क्रिकेटपटू ठरला. भारतीय (India) फिरकीपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या 14 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक धावा केल्याबरोबर होपने हा विक्रम नोंदवला. होपला वेगवान 3,000 वनडे धावा पूर्ण करण्यासाठी 35 धावांची गरज होती. कटकच्या बाराबती स्टेडियमवर त्याने 35 वी धावा पूर्ण केल्यावर होपने हा विक्रम नोंदवाला. होपने वेस्ट इंडीजचा महान फलंदाज सर व्हिव्ह रिचर्ड्स (Sir Viv Richards) यांचा 35 वर्षांचा विक्रम मोडला. यापूर्वी वेस्ट इंडीजकडून वेगवान 3,000 वनडे धावा करण्याचा विक्रम रिचर्ड्सच्या नावावर होता. रिचर्ड्सने 1984 मध्ये 69 डावात 3,000 धावा पूर्ण केल्या होत्या तर होपने 67 डावांमध्ये हा आकडा पार केला. शिवाय, सर्वात वेगवान 3,000 धावा पूर्ण करणारा होप जगातील दुसरा फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमला (Hashim Amla) याच्या नावावर वन डे इतिहासातील सर्वात वेगवान 3000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम आहे. अमलाने 58 डावात हा पराक्रम केलेला होता. (PAK vs SL 2nd Test: बाबर आझम, अझर अली, अबिद अली आणि शान मसूद यांनी शतकं ठोकत केली भारताच्या विश्व रेकॉर्डची केली बरोबरी)

वेस्ट इंडीजबद्दल बोलायचे झाले तर वेगवान 3,000 वनडे धावा काढण्याच्या बाबतीत होप अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर रिचर्ड्स, तिसर्‍या क्रमांकावर गॉर्डन ग्रीनिज, चौथ्या क्रमांकावर ब्रायन लारा (Brian Lara) आणि पाचव्या क्रमांकावर युनिव्हर्सचा क्रिस गेल आहे. दुसरीकडे, जागतिक स्तरावर होप  दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझम याने 68 डावांमध्ये हा आकडा पार केला तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर चौथे आणि पाच क्रमांकावर रिचर्ड्स आणि ग्रीनिज आहेत.

दरम्यान, कटकमध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये होप आणि एव्हिन लुईस यांनी भारतीय गोलंदाजीचा सामना करत पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये होपने 50 चेंडूत 5 चौकारांसह 42 धावांची खेळी केली. भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजने टी-20 आणि वनडे मालिकेत भारताला चांगली लढत दिली. मात्र टी-20 मालिकेत त्यांना 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले.