भारतीय संघाच्या (Indian Team) मधल्याफळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध विशाखापट्टणम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये आश्चर्यकारक बॅटिंगने क्रिकेट प्रेमींचे मनोरंजन केले. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने जेव्हा एक धाव कमी केली तेव्हा त्याने आपले अर्धशतक साजरे केले. रोस्टन चेस (Roston Chase) याव्या षटकात चार षटकार आणि एक चौकार मारत त्याने 49 धावांची मजल मारली. त्यांनतर त्याने उत्साहाने बॅट उंचावल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याला एक धाव कमी असल्याचे संकेत दिले. या क्षणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. अय्यर 36 व्या षटकात 20 धावांवर फलंदाजी करीत होता. पहिल्या डिलिव्हरीवर चेसने ना-बॉल टाकला आणि अय्यरने एक धाव घेतली. रिषभ पंत याने नंतर स्ट्राईक दिल्यानंतर अय्यरने चार षटकार आणि एक चौकार ठोकला आणि 49 धावांची मजल मारली. (IND vs WI 2nd ODI: भारताची जोरदार सुरुवात; रोहित शर्मा याने विराट कोहली याला मागे टाकत मिळवले अव्वल स्थान, List A क्रिकेटमध्ये पूर्ण केले 11,000 रन्स)
श्रेयसने अर्धशतक पूर्ण झाल्याचा विचार करत आपली बॅट हवेत उचलली. तथापि, त्याला अजूनही एक धाव हवी होती. कोहलीनेही त्याला याविषयी हावभाव करून संकेत दिले. आपण या घटनेचा व्हिडिओ सामना कव्हर करणाऱ्या हॉटस्टार सारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. अय्यरच्या घटनेवर सोशल मीडिया यूजर्सने दिलखुलासपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे तेर 'अॅडव्हान्सच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सारखे'
— NISHANT BARAI (@maibhiengineer_) December 18, 2019
हाहाहा!
Shreyas thinks he has got his fifty. You can see Virat is aware it's 49 😁
— KASHISH (@crickashish217) December 18, 2019
श्रेयस अय्यरचा शानदार डाव!
Wow. Sooo happy with performance. #RohitSharma #RishabhPant #ShreyasIyer 😍😍😍
— Shreyas Iyer (@Cric_adamant) December 18, 2019
'विध्वंसक'
SHREYAS IYER!🔥🔥🔥🔥
— sidhearts. (@zebarainaaaa_) December 18, 2019
आणि पंत त्याचे अभिनंदन करत आहे!
Shreyas Iyer celebrating his 50 while he’s still on 49! You love to see this game. 😂🙌🏼
— Devang Sadhwani (@devangsadhwani) December 18, 2019
यानंतर अय्यरनेही दमदार डाव खेळला. अय्यरने केवळ 32 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि षटकारांच्या मदतीने 16 चेंडूत 39 धावा केल्या यात 4 शतकात आणि 3 चौकारांचा समावेश होता. अय्यरने रिषभ पंत याच्या साथीने फक्त 23 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचे 388 धावांचे मोठे आव्हान आहे. भारताकडून रोहित शर्मा याने 159 धावा केल्या तर त्याचा सलामीचा साथीदार केएल राहुल याने 102 धावा केल्या.