IND vs WI 2nd ODI: भारताची जोरदार सुरुवात; रोहित शर्मा याने विराट कोहली याला मागे टाकत मिळवले अव्वल स्थान, List A क्रिकेटमध्ये पूर्ण केले 11,000 रन्स
विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) सध्या विशाखापट्टणम स्टेडियममध्ये वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. मालिकेत बरोबरी करण्याच्या इच्छेने सामना खेळत असलेल्या भारतीय संघासाठी (Indian Team) सलामीची जोडी केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी शानदार सुरुवात करून दिली आहे. रोहित आणि राहुल सध्या चांगल्या फॉर्मयामध्ये आहे आणि दोंघांमध्ये 150 पेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली आहे. दोघांनी भारताला हवी तशी सुरुवात करून दिली आहे. 2019 मध्ये रोहित मर्यादित षटकांच्या स्वरूपात धावपटूंवर वर्चस्व गाजवत आहेत. सध्या, 2019 मध्ये वनडे सामन्यात तो आघाडीवर आहे आणि राहुलच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध वर्चस्व राखले आहे. रोहित आणि राहुल क्रीजवर फलंदाजी करत आहे. तथापि, विझागमधील खेळीने त्याला लिस्ट ए (List A) क्रिकेटमधील या कामगिरीतील खेळाडूंच्या एलिट यादीमध्ये स्थान मिळवून दिले आहे. (IND vs WI 2nd ODI: विराट कोहली याने इतिहास रचला, 'ही' कामगिरी करणारा बनला 8 वा भारतीय क्रिकेटपटू)

रोहितने या मॅचमध्ये पहिले 36 धावा केल्या तेव्हा त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा गाठणारा आठवा खेळाडू ठरला. रोहितने केवळ 290 व्या मॅचमध्ये ही कामगिरी केली आणि या प्रारूपात या शिखरावर पोहोचलेल्या इतर सात भारतीयांसह तो सामील झाला. सचिन तेंडुलकर याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावांची नोंद केली आहे. त्याने 551 सामन्यात 21,999 धावा केल्या आहेत. सचिननंतर सौरव गांगुली याने 437 सामन्यात 15, 622, राहुल द्रविड 15, 271, महेंद्र सिंह धोनी 13, 353 आणि विराट कोहली 12, 966 धावा केल्या आहेत. विझाग मॅचमध्ये विराट 13,000 लिस्ट ए धावांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. इतकंच नाही, तर रोहितने विराटला मागे टाकत वर्ष 2019 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. रोहितने यंदा 1300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर विराटने 1292 धावा नोंदवल्या आहेत. मात्र या सामन्यात विराटला पुढे जाण्याची संधी आहे.

2019 च्या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर रोहित आणि कोहलीनंतर वेस्ट इंडिजचा शाई होप या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. होपने आतापर्यंत 26 सामन्यांच्या 24 डावांमध्ये 1,225 धावा केल्या आहेत. म्हणजेच या स्पर्धेत अव्वल स्थान गाठण्यासाठी या तीन फलंदाजांमध्ये अतिशय जवळची स्पर्धा आहे. यावर्षी आजवर केवळ 6 खेळाडूंनी 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.