भारतीय संघ (Indian Team) संध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. यादरम्यान आज, 22 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची टेस्ट मालिका सुरु होत आहे. पण, त्याआधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स (Sir Viv Richards) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर शेअर केला. कोहलीने व्हिडिओच्या सुरूवातीस सांगितले की या भूमिकेत (अँकर) तुम्ही मला फारसे पाहणार नाही, पण आज मी हे एका विशेष कारणासाठी करीत आहे. त्यानंतर कोहलीने रिचर्ड्सची ओळख करून दिली. त्याने सर व्हिव्हियन यांना क्रिकेट संबंधी अनेक प्रश्न विचारले. (IND vs WI 2019: रोहित शर्मा पोटाला घाबरला? थेट के एल राहुल याच्या पाठी लपला?; विराट कोहलीने शेअर केला फोटो, Netizens ने केले ट्रोल)
दुसऱ्या अॅशेसच्या सामन्यात जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचा एक बाउन्सर ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याला मानेला लागला आणि तो मैदानावरच कोसळला. त्यामुळे स्मिथला तिसऱ्या टेस्टमधून माघार घ्यावी लागली. सध्या क्रिकेटविश्वात याच गोष्टीबाबत गंभीरपणे चर्चा सुरु आहे. कोहली आणि रिचर्ड्स यांनी देखील या मुलाखतीदरम्यान यावर चर्चा केली आणि आपले मत प्रदर्शित केले. कोहली म्हणाला की, "माझा नेहमीच असा विश्वास आहे की सुरुवातीला बाउन्सरचा सामना करणे चांगले आहे. असे पुन्हा न व्हावे यासाठी मला प्रेरणा मिलते. शरीरावर ती वेदना जाणवून देते की असे पुन्हा होऊ नये." दरम्यान, कोहलीने विचारले असता की त्यावेळी धोकादायक वेगवान गोलंदाजी सूनही आपण हेल्मेट का घालायचे नाही, यावर रिचर्ड्स म्हणाले, "मी मर्द आहे. हे अभिमानाने भरलेले वाटेल पण मी कोणत्या प्रकारचा गेम खेळत आहे हे मला माहित होते. माझा प्रत्येक वेळी माझ्यावर विश्वास ठेवला. आपण जखमी झालो तरीही आत्मविश्वास सोडायचो नाही." ते म्हणाले, :मला हेल्मेट अस्वस्थ वाटायचे. मला मारून कॅपचा अभिमान होता आणि मी तोच घालायचो. मला वाटायचं की मला दुखापत झाली तरीसुद्धा मी जिवंत राहणार."
Special: @imVkohli in conversation with @ivivianrichards (Part 1)
King Kohli turns anchor and quizzes the Caribbean Master to understand his fearless mindset - by @28anand
Full interview 🎥 - https://t.co/HHGvlzfFEi pic.twitter.com/ikl7oifKSi
— BCCI (@BCCI) August 22, 2019
दुसरीकडे, रिचर्ड्स या विषयावर म्हणाले की, "हा खेळाचा एक भाग आहे. आपण अशा गोष्टींवर किती मात केली यावर सर्व अवलंबून आहे." याचदरम्यान, कोहलीने रिचर्ड्सचे गुणगान देखील गायले. तो म्हणाला, "सर विव्हियन रिचर्ड्स आम्ही सर्व फलंदाजांसाठी प्रेरणास्रोत आहेत. रिचर्ड्सने कोहलीसह समानतेबद्दल सांगितले, "माझा नेहमीच उत्तम प्रकारे बोलण्यात माझा विश्वास होता. माजी आणि विराटची उत्कटता एकसमान आहे. बर्याच वेळा लोक आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात आणि म्हणतात की हे रागतात का असतात."