जसप्रीत बुमराह (Photo Credit: AP) सर व्हिव्हियन रिचर्ड्स (Photo: officiallyvivian/Instagram)

भारतीय संघ (Indian Team) सध्या कॅरिबियन मिशनवर टेस्ट मालिका खेळत आहे. यात विंडीजचा माजी फलंदाज सर विव्हियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) यांनी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचे कौतुक केले आहे. रिचर्ड्स म्हणाले की, जर ते सध्या फलंदाजी करत असते तर त्यांना बुमराहला खेळण्यास भीती वाटली असती. इतकेच नाही तर रिचर्ड्स म्हणाले की बुमराहऐवजी ते ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज डेनिस लिली (Dennis Lillee) यांची वेगवान गोलंदाजी खेळण्यास प्राधान्य दिले असते. सध्या बुमराह सर्वात धोकादायक गोलंदाज आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 16 व्या क्रमांकावर असलेला बुमराह वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत त्याच्या सततच्या धोकादायक गोलंदाजीबद्दल बोलताना रिचर्ड्सने बुमराहच्या पाठीवर कौथुकाची थाप दिली. (IND vs WI 1st Test: विराट कोहली याने घेतली विव रिचर्ड्स यांची मुलाखत, बाऊन्सरवर दोघांनी मांडले आपले मत, पहा व्हिडिओ)

रिचर्ड्स यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "बुमराह ऐवजी त्यांना लिलीविरुद्ध खेळायला आवडेल कारण त्याची ऍक्शन इतकी प्रभावी नाही. लिलीच्या गोलंदाजीत तो कायपुढे करणार आहे हे आपण समजू शकता परंतु बुमराहला समजणे कठीण आहे." रिचर्ड्स पुढे म्हणाले, "बुमराहच्या रुपात भारताकडे हिरा आहे. तो जितका जास्त तंदुरुस्त राहील आणि जितका जास्त वेळ तो खेळत राहील ते संघासाठी फायद्याचे ठरेल."

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज डेनिस लिलीने आपल्या कारकीर्दीत 70 टेस्ट मॅचमध्ये 355 विकेट्स घेतले आहेत. 70 आणि 80 च्या दशकात लिलीच्या गोलंदाजीने सर फलंदाज घाबरायचे. लिलीने 63 वनडे सामने खेळले आणि 20.82 च्या सरासरीने 103 विकेट्स घेतले. 34 धावा देऊन पाच विकेट्स ही त्याची वनडेमधील सर्वोत्तम कामगिरी होती. दुसरीकडे, विश्वचषकनंतर बुमराहला विंडीजविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. ज्यानंतर बुमराह आता भारतीय संघासह दोन टेस्ट सामन्यांची मालिका खेळत आहे.