IND vs SL 1st T20I: टी-20 आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज, पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरेल तगड्या खेळाडूंची फौज; पाहा संभाव्य प्लेइंग XI
रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st T20I 2021: तीन दिवसीय वनडे मालिकेत यजमान श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध 2-1 असा विजय मिळवून भारतीय संघाने (Indian Tem) मालिका खिशात घातली. आता दोन्ही संघ टी-20 मालिकेकडे आपले लक्ष केंद्रित करतील. युएई व ओमान येथे होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची आहे कारण आयसीसी स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची (Team India) ही अखेरची मर्यादित ओव्हरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. या भारतीय खेळाडू युएई मधेच आयपीएल खेळताना दिसतील. दरम्यान, संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार असून या मालिकेसाठीही अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मालवण्यात कोणता खेळाडू बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (IND vs ENG Series 2021: दुखापतग्रस्त खेळाडूंची बदली म्हणून भुवनेश्वर कुमार सह श्रीलंका दौऱ्यावरील तीन खेळाडू होऊ शकतात ब्रिटनला रवाना)

शिखर धवन पुन्हा एकदा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या जोडीने सलामीला येईल. यापूर्वी वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉचे हे टी-20 पदार्पण होईल. तसेच तिसऱ्या स्थानावर ईशान किशन व चौथ्या स्थानावर सूर्यकुमार यादव मैदानावर उतरतील. पृथ्वी, ईशान व सूर्यकुमारने यापूर्वी वनडे मालिकेत आपल्या आक्रमक फलंदाजीचे कौशल्य दाखवले होते आणि टी-20 मालिकेत देखील त्यांच्याकडून तशाच खेळाची अपेक्षा असेल. विशेष म्हणजे वनडे मालिकेत बॅटने अपयशी ठरलेल्या मनीष पांडे पहिल्या टी-20 सामन्यात कामगिरी सुधारण्याची संधी दिली जाऊ शकते. अष्टपैलू म्हणून पांड्या बंधू, हार्दिक व कृणाल, देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील. दुसरीकडे, भारताचा गोलंदाजीक्रम देखील मजबूत दिसत आहे. भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजी हल्ल्याचे नेतृत्व करेल त्याला दीपक चाहरची साथ मिळेल. तसेच फिरकी गोलंदाज म्हणून राहुल चाहर व वरुण चक्रवर्तीचे पदार्पण होऊ शकते. श्रीलंकेविरुद्ध या टी-20 मालिकेने सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासह खेळाडू विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे दार ठोठावू शकतात.

पाहा भारताचा संभार प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती.