IND vs SA Series 2022: ‘आम्ही लहानपणापासून खूप वेगाने खेळत आहोत...’, T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका कर्णधाराचे उमरान मलिकवर मोठे विधान
टेंबा बावुमा (Photo Credit: Twitter/OfficialCSA)

IND vs SA Series 2022: टीम इंडियाने (Team India) मायदेशात आगामी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मासह, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. यामुळे पाहुणा दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 मालिका जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. पण Proteas चा व्हाईट बॉल कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारताला हलके घेत नाही. 2 जून रोजी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यासाठी (South Africa Tour of India) पोहोचणार आहे. अशा परिस्थितीत बुधवारी रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना बावुमा म्हणाला की केएल राहुल, ऋषभ पंत आणि संघातील इतर अनेक वरिष्ठ खेळाडूंसह भारत चांगल्या हातात असेल. (IND vs SA Series 2022: कर्णधार KL Rahul पुढे मोठे आव्हान, दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मोडणार टी-20 विश्वविक्रम?)

गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात शेवटचा T20 सामना खेळलेला दक्षिण आफ्रिका संघ ऑस्ट्रेलियात या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 ची तयारी भारत मालिकेसह सुरु करेल. “महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वचषकाची तयारी करणे. मुलांनी स्पर्धात्मक असणे आवश्यक आहे. आणि भारतातील मालिका ही स्पर्धात्मक प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असेल. ऑस्ट्रेलियापेक्षा परिस्थिती वेगळी असेल पण आमच्यासाठी त्या स्पर्धात्मक असणे महत्त्वाचे आहे,” बावुमा म्हणाला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. 22 वर्षीय काश्मिरी वेगवान गोलंदाज आयपीएल 2022 मध्ये 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याच्या क्षमतेसाठी प्रकाश झोतात आला आणि आता आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

“उमरान मलिक हा भारतीय संघासाठी एक रोमांचक वेगवान गोलंदाजीची शक्यता आहे. आयपीएल भारतीय संघासाठी उत्कृष्ट ठरले आहे कारण ते या सर्व वेगवान गोलंदाजीचे पर्याय शोधण्यात सक्षम आहेत,” टेंबा बावुमा म्हणाला. “मला वाटते की दक्षिण आफ्रिकेत आम्ही वेगवान गोलंदाजांना तोंड देत मोठे झालो आहोत पण मला वाटत नाही की कोणत्याही फलंदाजाला 150 किमी प्रतितास वेगाने चेंडूचा सामना करणे आवडत नाही. परंतु तुम्ही जमेल तशी तयारी करा. आमच्याकडे 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकणारे खेळाडूही आहेत. ते शस्त्र आमच्या शस्त्रागारात आहे. पण उमरान मलिक हा टीम इंडियासाठी विशेष प्रतिभा आहे आणि मला आशा आहे की तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या आयपीएल कामगिरीचे अनुकरण करू शकेल,” बावुमा पुढे म्हणाला.