IND vs SA 3rd Test: उमेश यादव याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ठोकले एकापाठोपाठ 5 षटकार, विराट कोहली ही झाला अवाक, पहा Video
उमेश यादव (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील रांची कसोटीच्या दुसर्‍या दिवशी उमेश यादव (Umesh Yadav) ने आपली फलंदाजीने सर्वांना आर्श्चरचाकीत केले. 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या उमेशने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज जॉर्जे लिंडे (George Linde) याच्या चेंडूवर एकापाठोपाठ 5 षटकार ठोकले आणि दहा चेंडूंत 31 धावा काढून तो बाद झाला. भारतीय संघाच्या पहिल्या डावात 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेल्या उमेशने पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यास सुरुवात केली. उजव्या हाताचा फलंदाज उमेशने सलग डावात एकूण 5 षटकार लगावले. यांच्यानंतर उमेशने सहावा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला, पण विकेटकीपरच्या हाती झेलबाद झाला. या सामन्यात उमेशने 310 स्ट्राइकरेटची नोंद केली. त्याने आपल्या खेळीत केवळ 1 एकल धावा काली आणि उर्वरित 30 धावा षटकारांसह केल्या. (IND vs SA 3rd Test Day 2: रोहित शर्मा याचा डबल धमाका, टेस्ट कारकिर्दीत पहिल्यांदाच झळकावले दुरेही शतक)

रवींद्र जडेजा अर्धशतक ठोकल्यानंतर बाद झाला आणि त्यानंतर उमेश क्रीजवर आला. त्याने मैदानात येताच पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार ठोकले. त्याने सर्व षटकार लिंडेच्या चेंडूवर केले. यादवचा 10 चेंडूत 31 धावांचा डाव कसोटी क्रिकेटमध्ये 30 हून अधिक धावांसाठी सर्वात जलद आहे. दरम्यान, उमेशची ही तुफानी खेळी पाहून स्वतः कर्णधार विराट कोहली देखील अचंबित झाला. आणि ड्रेसिंग रूममध्ये बसून आपला आनंद व्यक्त केला. उमेश जेव्हा बाद झाल्यावर परतला तेव्हा विराट कोहलीने टाळ्यांचा जयघोष करत त्याचे स्वागत केले.

दुसरीकडे, भारताने त्यांचा पहिला डाव ४ बाद ४९७ धावांवर घोषित केला. भारतासाठी रोहित शर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. रोहित २१२ धावांवर माघारी परतला. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले दुहेरी शतक केले. यापूर्वी त्याची सर्वोच्च धावसंख्या 177 होती.