IND vs SA 3rd T20I: रोहित शर्मा ने केली एमएस धोनी च्या रेकॉर्डची बरोबरी, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध केली 'ही' कामगिरी
रोहित शर्मा आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर यंदाच्या टी-20 मालिकेत आमने-सामने येणास सज्ज आहे. आजच्या निर्णायक मॅचमध्ये टॉस जिंकून टीम इंडियाने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी टीम इंडियात कोणताही बदल नाही आहे. उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. कर्णधार विराट कोहली याने मागील टी-20 मॅचमध्ये 72 धावा करत रोहितकडून टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमधील अव्वल स्थान हिरकवून घेतले. पण, आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करण्यात आल्याने रोहितने भारतासाठी एका नव्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (एमएस धोनीच्या फॅन्ससाठी निराशाजनक बातमी, इतक्या महिन्यांसाठी टीम इंडियातुन राहणार बाहेर)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या मॅचमध्ये रोहितने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. धोनीने भारतासाठी सर्वाधिक 98 मॅच खेळले आहेत. तर, आजचा सामना रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 98 वा सामना आहे. यासह रोहित आणि धोनीने टीम इंडियासाठी आजवर सर्वात जास्त सामने खेळले आहेत. रोहितने 2006 मध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण केले होते. रोहितने रविवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात या विक्रमाची बरोबरी केली. सर्वात धोकादायक सलामीवीर रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 98 मॅचमध्ये भारतीय संघासाठी 4 शतके आणि 17 अर्धशतकांसह 2434 धावा केल्या आहेत. शिवाय, या फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा तो जगातील पहिला खेळाडू आहे. रोहित आणि धोनीच्या मागे 78 मॅचसह सुरेश रैना तर तिसऱ्या स्थानावर 72 मॅचसह विराट आहे. त्यानंतर यंदाच निवृत्ती जाहीर केलेला युवराज सिंह याने 58 सामने खेळले आहेत तर शिखर धवन याचा हा 55 वा सामना आहे.

दरम्यान, धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर दुसर्‍या सामन्यात गोलंदाज आणि विराटच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारताने सात विकेट्सने सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाला जिंकत दक्षिण आफ्रिकाविरुद्ध क्लीन-स्वीप करण्याची संधी आहे.