टीम इंडियाचे चाहते सध्या एकच प्रश्न विचारात आहे आणि तो म्हणजे माजी कर्णधार, कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) संघात पुनरागमन कधी करणार. याबाबत एक रिपोर्ट समोर आली आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार धोनीने आपली सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यामुळे तो अजून काही वेळ क्रिकेटपासून लांब राहणार आहे. रिपोर्टनुसार, धोनी नोव्हेंबरपर्यंत क्रिकेटपासून दूर राहील. याचा अर्थ असा की, बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी तो संघात सहभागी होणार नाही. बांगलादेशविरुद्ध मालिकेतील पहिला सामना दिल्लीत, दुसरा राजकोट आणि तिसरा सामना नागपुरमध्ये खेळला जाईल. शिवाय, क्रिकेटपासून त्याच्या ब्रेक होण्याचा अर्थ असादेखील आहे की तो दोन दिवसानंतर सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मध्ये देखील भाग घेणार नाही. (एमएस धोनीचा टाइम ओव्हर, 2020 टी-20 विश्वचषकसाठी सुनील गावस्कर यांची 'या' खेळाडूला पहिली पसंती)
नोव्हेंबरपर्यंत धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही आणि आता असे मानले जात आहे की वेस्ट इंडीजविरुद्ध घरच्या मैदानावर वनडे आणि टी-20 मालिकेसह डिसेंबरमध्ये संघात पुनरागमन करेल. आणि जर तो या मालिकेतदेखील नाही खेळला तर चाहत्यांना झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेची प्रतीक्षा करावी लागेल, जी 5 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत खेळली जाईल.
इंग्लंडमध्ये विश्वचषकनंतर धोनी टीम इंडियापासून लांब राहिला आहे. विश्वचषक संपल्यापासून प्रत्येकाची नजर भारतीय दिग्गज धोनीवर आहे. विश्वचषकनंतर त्याच्या निवृत्ती चर्चा जोर पकडत आहे. पण, विश्वचषक संपल्यानंतर 38 वर्षीय धोनीने निवृत्त न घेता क्रिकेटमधून विश्रांती घेतली आणि टेरिटोरियल आर्मीबरोबर प्रशिक्षण घेण्यासाठी काश्मीरला गेला. मागील महिन्यात कॅरेबियन दौर्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या वनडे आणि टी-20 संघातही धोनी समावेश केला नव्हता. शिवाय, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरू असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठीदेखील त्याने आपली उपस्थिती दर्शवली नाही. त्यामुळे, चाहत्यांना आता त्याला पुन्हा एकदा टीम इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये पाहण्याची उत्सुकता वाढत चालली आहे.