एमएस धोनी याचा टाइम ओव्हर, 2020 टी-20 विश्वचषकसाठी सुनील गावस्कर यांची 'या' खेळाडूला पहिली पसंती
(File Photo)

माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय विकेटकीपर महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीबद्दल असे बोलले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक लक्षात घेता गावसकरांचा असा विश्वास आहे की, धोनीची वेळ आली आहे आणि आता भारतीय संघाने त्याच्या पलीकडे पाहायला हवे आणि युवा खेळाडूंमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले. पण, उपलब्ध पर्यायांवर बरीच चर्चा आहे कारण रिषभ पंत (Rishabh Pant) याला उपलब्ध संधींचा फायदा घेण्यास अयशस्वी राहिला पण पुढच्या वर्षीच्या वर्ल्ड टी-20 साठी तो गावस्करांची 'पहिली पसंती' आहे. धोनीला आगामी बांग्लादेश दौर्‍यासाठी निवडले जाईल की नाही असे असे विचारले असता गावस्कर यांनी नकारार्थी उत्तर दिले. (महेंद्र सिंह धोनी ची पत्नी साक्षी हिचे हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल, एम एस धोनीच्या चाहत्यांनी वहिनींना दिला हा बहूमोल सल्ला)

“नाही, त्याच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे. महेंद्र सिंह धोनी किमान माझ्या संघात नाही. जर तुम्ही टी-20 विश्वचषकबद्दल बोलत असाल तर मी रिषभ पंतबद्दल नक्कीच विचार करेन,” गावस्करांनी आज तक चॅनेलला सांगितले. शिवाय, गावस्कर म्हणाले की, जर पंत चांगली कामगिरी करत नसेल तर संजू सॅमसन हा पुढील सर्वोत्तम पर्याय आहे. “जर मला पर्यायी पर्याय हवा असेल तर मी संजू सॅमसनबद्दल विचार करेन कारण संजू एक चांगला कीपर तसेच एक उत्तम फलंदाजदेखील आहे.”

गावस्कर म्हणाले की "टी-20 विश्वचषकबद्दल विचार करता मी युवा खेळाडूंचा विचार कारेन. धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे पण आता त्याच्या पलीकडे पहाण्याची वेळ आली आहे." आयसीसी विश्वचषकच्या सेमीफायनलनंतर त्याने कोणतेही सामने खेळलेले नाहीत. तो वेस्ट इंडिज दौर्‍यावर गेला नव्हता. शिवाय, सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिकेसाठीच्या भारतीय संघाचा तो भाग नाही. त्याने या मालिकेतूनही विश्रांतीही घेतली आहे.