भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात अखेर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टेस्ट क्रिकेटमध्ये यश मिळवले आहे. टीम इंडियासाठी पहिल्या डावात रोहितने 176 धावांची खेळी केली आणि मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 300 पेक्षा आधी धावांची भागीदारी केली. रोहितने या खेळीदरम्यान 23 चौकार आणि सहा षटकार लगावले. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये रोहितची शानदार फलंदाजी पाहत माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध असेलेल्या शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने 'हिटमॅन' ला एक नवीन टोपण नाव देऊन टाकले. शोएबने रोहितसोबतचा एक जुना किस्सा शेअर केला आहे. (IND vs SA 1st Test Day 2: रोहित शर्मा याची 176 धावांची तुफान खेळी, द्विशतक हुकल्याने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये निराशा)
शोएबने यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितले की 2013 मध्ये रोहितशी त्याची भेट झाली होती. शोएबने सांगितले की, 'तुझे नाव काय आहे' मी रोहितला सांगितले, यावर रोहित म्हणाला की भाऊ तुला माझे नाव माहित आहे, रोहित शर्मा. यानंतर शोएब म्हणाला की तू तुझ्या नावापुढे जी लावण्याची सुरुवात कर. शोएबने या जीचा अर्थदेखील सांगितला आहे. शोएबने म्हटले आहे की रोहित शर्मा... रोहित शर्मा नसून ग्रेट रोहित शर्मा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकणारा शोएब म्हणाला की त्याने 6 वर्षांपूर्वी सांगितले होते की एक दिवस तो भारताचा महान फलंदाज होईल. शोएबने पहिल्या दिवशी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने हिटमॅनचे कौतुक केले आणि म्हटले आहे की आगामी इंग्लंड दौर्यावरील कसोटी मालिकेत रोहितकडून 1000 पेक्षा जास्त धावा बघायला आवडेल.
रोहितने वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आणि सलग धावादेखील केल्या आहेत, परंतु रोहित कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी ठरत होता. पण, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत रोहितने स्वत: ला सलामीवीर म्हणून सिद्ध केले आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी रोहितने शतक झळकावले, त्यात डझनभर चौकार आणि षटकार लगावले. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक ठोकली आहेत आणि आता टेस्टमध्ये देखील त्याने सलामीवीर म्हणून शानदार सुरुवात केली आहे.