IND vs SA 1st Test Day 2: रोहित शर्मा याची 176 धावांची तुफान खेळी, द्विशतक हुकल्याने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये निराशा
रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

फॉरमॅट बदलला असला तरीही 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खेळात काही बदल झाला नाही. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध रोहितने शानदार फलंदाजी केली आणि टेस्टमध्ये दुसऱ्यांदा दीडशे धावा पूर्ण केल्या. टेस्टमध्ये पहिल्यांदा सलामीला आलेल्या रोहितने सुरुवातीपासून दक्षिण आफ्रिकाई गोलंदाजांवर वर्चस्वास राखले आणि मयंक अग्रवाल याच्या साथीने संघाला चांगली सुरुवात केली. टी-20 मध्ये फलंदाजीने रोहितने चाहत्यांना निराश केले होते, मात्र ते चित्र त्याने पुन्हा रिपीट नाही केले. विशाखापट्टणममधील व्हीडीसीए स्टेडियममधील चाहत्यांचे त्याने चांगले मनोरंजन केले रोहितने दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांची जणू काही शाळाच घेतली. पण, रोहित 176 धावांवर केशव महाराज (Keshav Maharaj) याच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि वनडेसह टेस्टमध्ये देखील द्विशतक करण्याचे स्वप्न हुकले. (IND vs SA 1st Test Day 2: रोहित शर्मा सह मयंक अग्रवाल याचा धमाका; पहिल्या विकेटसाठी केली रेकॉर्ड भागीदारी, Lunch पर्यंत टीम इंडियाचा स्कोर 324/1)

रोहितच्या या पराक्रमाचे सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुक केले. रोहितने त्याच्या या डावात 18 चौकार आणि पाच षटकार ठोकले. दरम्यान, सलामीवीर म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात 150 पेक्षा अधिक धावा करणारा तो दुसरा भारतीय खेळाडूही ठरला. पण, द्विशतक पूर्ण न करता बाद झाल्याने चाहते निराश झालेले दिसत आहे.

पहा सोशल मीडियावरील चाहत्यांच्या निराशा

द्विशतक हुकले

बर्‍याच दिवसांनंतर आपण पाहिलेला एक उत्तम कसोटी डाव ...

टेस्ट द्विशतकाची अपेक्षा होती पण सलामी फलंदाज म्हणून ही फक्त सुरुवात आहे

रोहित शर्मा चांगला खेळला. आता आशा आहे की मयंक द्विशतक करेल 

दुसरीकडे, रोहित आणि मयंकने पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली. पण, रोहितला टेस्ट करिअरमधील सर्वाधिक धावा करण्याची संधीदेखील हुकली. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध २०१३ मध्ये १७७ धावांची खेळी केली होती. ही त्याची टेस्टमधील सर्वाधिक धावा होत्या. दरम्यान, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्टमध्येरोहितचे चौथे शतक होते.