रोहती शर्मा, मयंक अग्रवाल (Photo Credits: BCCI-Twitter)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या सलामी फलदांज-रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) यांनी आप दबाव कायम ठेवला. सुरुवातीला मयंकने टेस्टमधील पहिले शतक पूर्ण केले. मयंकने आपल्या कारकीर्दीतील पहिले चार कसोटी परदेशात खेळले आणि या चार सामन्यातील त्याची सर्वाधिक धावा 77 धावा होती. मयंकने 204 चेंडूत 13 चौकार आणि दोन षटकारांसह शतक पूर्ण केले. रोहित आणि मयंकने दुसऱ्या दिवशीही उत्कृष्ट फलंदाजी केली. लंचपर्यंत भारताने रोहितची विकेट गमावली. रोहित 176 धावांवर बाद झाला. भारताने 324 धावांवर एक विकेट गमावली.  मयंक आणि रोहितने 317 धावांची भागीदारी केली. भारतासाठी ही दुसरी मोठी भागीदारी ठरली. (IND vs SA 1st Test Day 2: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मयंक अग्रवाल-रोहित शर्मा यांनी ओपनिंग भागीदारीत केल्या सर्वाधिक धावा, स्पेशल क्लबमध्ये मिळवले स्थान)

यानंतर ड्रिंक्स ब्रेकनंतर रोहितने एक धाव काढत दीडशे धावा पूर्ण केल्या. रोहितच्या टेस्ट करिअरमधील हे दुसरे दीडशे धावा होत्या. यापूर्वी रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध 2013 मध्ये 150 धावांचा टप्पा ओलांडला होता. रोहितच्या टेस्टमधील सर्वाधिक धावा 177 आहे. यंदाच्या मॅचमध्ये रोहित केशव महाराज (Keshav Maharaj) याचा शिकार बनला. लंचपर्यंत मयंक 138 धावांवर आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 6 धावांवर खेळत आहे.

यापूर्वी पहिल्या दिवशी 59.1 ओव्हरनंतर खेळ खराब प्रकाश आणि नंतर पावसामुळे सामना लवकर संपवनात आला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी रोहितने नाबाद 115 आणि मयंकने 84 धावा केल्या होत्या. वनडे आणि टी-20 नंतर पहिल्यांदा रोहितला टेस्टमध्ये सलामीला पाठवण्यात आले आहेत. यापूर्वी रोहित पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रानंतर पावसामुळे उर्वरित खेळ रद्द करण्यात आला होता. तेव्हा भारताने एकही विकेट न गमावता 202 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी रोहित आणि मयंकच्या जोडीने वर्चस्व राखत मोठा स्कोर करणे सुरु ठेवले.