IND vs SA 1st ODI: ‘गोलंदाजी कारवाईची नसेल तर खेळवू नका’, ‘या’ तडाखेबाज खेळाडूच्या उपस्थितीवर आकाश चोप्राने KL Rahul याच्या डावपेचांवर उचलले बोट
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 1st ODI: भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने (Aakash Chopra) बुधवारी पार्ल येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या वनडे सामन्यात अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) गोलंदाजी न करण्याच्या प्रभारी कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) डावपेचांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. गेल्या वर्षी टी-20 डेब्यू केलेल्या अय्यरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात वनडे पदार्पण केले. बोलंड पार्क येथील संथ खेळपट्टीचा फायदा भारतीय गोलंदाजांना घेता आला नाही आणि विकेट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला तरीही व्यंकटेशला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आकाश चोप्राने आश्चर्य व्यक्त केले की संघ व्यवस्थापन अय्यरला अष्टपैलू म्हणून मानत आहे का?आणि गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माच्या नेतृत्वात त्याच्या पदार्पणाच्या टी-20 मालिकेत त्याला गोलंदाजीसाठी जास्त षटके दिली गेली नाहीत हे देखील अधोरेखित केले. (IND vs SA 1st ODI: परदेशात विराट कोहलीचा धमाका, ‘हा’ मोठा रेकॉर्ड मोडून सचिन तेंडुलकरच्या ठरला वरचढ)

भारताने बुधवारी रॅसी व्हॅन डर डुसेन आणि टेंबा बावुमा यांनी प्रत्येकी एक शतक ठोकून 296 धावा लुटल्या. भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल या 3 गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही शार्दुलने प्रति षटकात 7 पेक्षा जास्त धावा दिल्या तरीही केएल राहुलने व्यंकटेश अय्यरकडे चेंडू टाकला नाही ज्याने डावाच्या सुरुवातीला एडन मार्करामला धावबाद केले. “त्यामुळे मी हैराण झालो. व्यंकटेश अय्यरला गोलंदाजी न करण्याच्या संदर्भात, केवळ केएल राहुलच नाही, रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध 2 टी-20 सामन्यातही असेच केले होते. भारताने मालिका जिंकल्यानंतरच त्याला गोलंदाजी देण्यात आली,” चोप्रा म्हणाले. दरम्यान, चोप्राने असेही म्हटले आहे की जर ते वेंकटेश अय्यरच्या गोलंदाजीचे कौशल्य वापरणार नसतील तर भारत सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशन यापैकी एकाला मधल्या फळीत खेळवण्याचा विचार करू शकतो. “म्हणून, फक्त आपणच व्यंकटेश अय्यरकडे एक अष्टपैलू म्हणून पाहत आहोत. असे दिसते की भारतीय विचारसरणी, संघ व्यवस्थापन आणि नेतृत्व गट त्याला अष्टपैलू म्हणून पाहत नाहीत, ही समज किंवा भावना तुम्हाला बाहेरून मिळते,” चोप्रा जोडले.

भारतासाठी सर्वाधिक यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह होता, ज्याने 48 धावांत 2 विकेट घेतल्या. रविचंद्रन अश्विनने 53 धावांत एक विकेट घेतली पण इतर गोलंदाजांनी यश मिळवण्यासाठी संघर्ष केला. कर्णधार टेंबा बावुमाच्या 110 आणि रसी वॅन डर डुसेनच्या नाबाद 129 यांच्यातही; चौथ्या विकेटसाठी 204 धावांची जबरदस्त भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 4 बाद 296 धावांपर्यंत मजल मारली.