IND vs PAK, ICC World Cup 2019: भारताचा पाकिस्तान वर आणखीन एक स्ट्राईक, अमित शहा यांचं टीम इंडियासाठी खास ट्विट
Amit Shah Praises Team India (Photo Credits: BCCI, File Image)

आईसीसी विश्वचषक 2019 ( ICC World Cup 2019) मध्ये काल मँचेस्टर (Manchester)  येथे झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात एकीकडे टीम इंडियाच्या शिलेदारांनी पाकिस्तानी संघावर दणदणीत विजय मिळवला आणि दुसरीकडे सव्वाशे कोटी भारतीयांच्या सेलिब्रेशनला सुरवात झाली. विराट ब्रिगेडच्या या यशस्वी खेळीसाठी वेगवेगळ्या माध्यमांवरून कौतुकाचा वर्षाव अजूनही सुरु आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)  यांनी सुद्धा एक हटके ट्विट करून टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. शहा यांनी आपल्या ट्विट मधून भारताच्या विजयाला पाकिस्तनवरील आणखीन एक स्ट्राईक असे म्हंटले आहे.

अमित शहा यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया देताना टीम इंडियाच्या खेळाचंही कौतुक केलं आहे. आपल्या ट्विट मधून, "टीम इंडियाने पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक केला आणि यापूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईक सारखाच परिणाम याहीवेळेस झाला आहे. संपूर्ण टीम इंडियाचं अभिनंदन. तुमची कामगिरी उत्तम होती. भारताच्या प्रत्येक नागरिकाला या विजयाबद्दल अभिमान वाटेल", असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. IND vs PAK, ICC World Cup 2019: सामना समाप्त होण्याआधीही च शाहिद अफ्रिदीने पराभव स्वीकारला, भारताच केल 'अभिनंदन'

अमित शहा ट्विट

यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही विराट ब्रिगेडचे कौतुक केले आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी टीम इंडियाचे फोटो शेअर करत संपूर्ण संघाचं अभिनंदन केलं. त्याशिवाय राज्यवर्धन राठोड, सचिन पायलट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक गेहलोत यांनीही टीम इंडियाचं अभिनंदन कातरून या दौऱ्यातील पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राजनाथ सिंह ट्विट

नितीन गडकरी ट्विट

पीयूष गोयल ट्विट

देवेंद्र फडणवीस ट्विट

किरण रिजीजू ट्विट

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा या दोन्ही देशातील संबंधांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. काल टीम इंडियाने पाकिस्तनला 337 धावांचे टार्गेट देऊन आपली प्रथम पारी खेळली होती त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपलं कौशल्य दाखवत पाकिस्तानी फलंदाजांचा धुव्वा उडवून टाकला. हिटमॅन रोहितशर्मा याला कालच्या सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच'  च्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. आयसीसी विश्वचषक सामन्याच्या इतिहासात भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा सातवा विजय आहे, त्यामुळे यंदा देखील टीम इंडियाला हरवण्याचा मौका पाकिस्तानच्या हातून निसटला असे म्हणता येईल .