IND vs NZ WTC Final 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात 18 ते 22 जून दरम्यान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (ICC World Test Championship Final) सामना लॉर्ड्स (Lords) क्रिकेट ग्राऊंडऐवजी साऊथॅम्प्टनच्या एजस बाऊल येथे खेळला जाणार आहे. एएनआयशी बोलताना बीसीसीआय (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी या विकासाची पुष्टी केली. “हो, COVID-19 च्या परिस्थितीवर लक्ष ठेवून साऊथॅम्प्टनमध्ये (Southampton) अंतिम सामना खेळला जाईल,” त्यांनी म्हटले. 23 जून हा रिझर्व्ह डे म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. आयसीसी पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करीत असून कोरोनामुळे लीग स्टेज आयोजित करण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागला. 4-कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडला 3-1 असे पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयासह टीम इंडियाने 72.2 विजयी टक्केवारीसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे तर किवी संघाने यापूर्वीच 70 विजयी टक्केवारीसह फायनलमध्ये प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलिया 69.2% सह तिसरा आणि इंग्लंड संघाला 61.4% सह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. (ICC World Test Championship Final 2021: टीम इंडियाची लॉर्ड्स वारी, ऑस्ट्रेलियाचं स्वप्न चक्काचूर करत मिळालं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट)
वृत्तानुसार, चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्स ऐवजी साऊथॅम्प्टनमध्ये होत आहे कारण येथे खेळाडूंना अधिक सुविधा मिळतील. स्टेडियममध्ये पंचतारांकित हॉटेल असून साऊथॅम्प्टन कोरोनाच्या वेळी बायो सिक्योर प्रोटोकॉल दरम्यान आयोजकांना चांगले लॉजिकस्टिक सुविधा उपलब्ध होऊ शकतात. लॉकडाउननंतर इंग्लंड संघाने पहिले वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध सामने याच मैदानावर खेळले होते. जगभरात झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा क्रिकेटवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलच्या स्वरूपामध्ये थोडा बदल केला, जेणेकरून कमी सामने असलेल्या संघाशी भेदभाव होणार नाही. अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात आयसीसीच्या क्रिकेट समितीने टक्केवारीच्या आधारे अंतिम दोन संघ निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. अंतिम फेरी गाठल्यानंतर भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन म्हणाला की तीन अंतिम सामन्यांत सर्वोत्कृष्ट ठरले असले परंतु संघ अंतिम सामन्यात आपले सर्वोत्तम प्रदर्शन करेल असे ज्येष्ठ गोलंदाजाने आश्वासन दिले.
WTC final to be played at Ageas Bowl in Southampton
Read @ANI Story | https://t.co/MlLjGtP9r4 pic.twitter.com/NiRa3kYGKV
— ANI Digital (@ani_digital) March 8, 2021
अश्विन म्हणाला की, “चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि माझ्यासारख्या खेळाडूंसाठी ज्यांना 2019 चा वर्ल्ड कप खेळता आला नाही, त्यांच्यासाठी हाच वर्ल्ड कप आहे. इशांतनेही याबद्दल बोलले आहे. मी संघातील सर्व सदस्यांसाठी आनंदी आहे. मी आशा करतो की आम्ही सकारात्मक परिणाम आणू. फायनलमध्ये 3 बाऊट्स असते तर छान झाले असते. परंतु येथे फक्त 1 सामना आहे आणि आम्हाला आमचे सर्वोत्तम काम करावे लागेल.”