टेस्ट कारकिर्दीतील 100 वा सामना खेळणारा न्यूझीलंडच्या (New Zealand) मधल्या फळीतील रॉस टेलर (Ross Taylor) आज 44 धावा करून बाद झाला. या सामन्यात 30 धावा करताच टेलरने भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला मागे टाकले. टेलरने विराटला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मागे टाकले. टेलरने आजवर 7218 धावा केल्या, तर विराटने 7204 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड दौऱ्या दरम्यान वेलिंग्टन (Wellington) मध्ये सुरु असलेल्या सामन्यात पहिल्या डावात कॅप्टन कोहली पुन्हा एकदा फेल झाला. यंदाच्या दौऱ्यावर विराटला टी-20 आणि वनडे मालिकेतही प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्याच्या फॉर्मवर सध्या टीकाकार प्रश्न उपस्थित करत आहे. (IND vs NZ 1st Test: एजाज पटेल च्या डायरेक्ट थ्रो ने रिषभ पंत झाला रनआऊट, अजिंक्य रहाणे वर Netizens ने केली टीका)
दुसरीकडे, किवी कर्णधार केन विल्यमसन याने माजी किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम यांना मागे टाकले. केनने 6458, तरमॅक्युलम 6453 धावा करून निवृत्त झाला. टीन इंडियाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यातविल्यमसन त्याच्या शतकाच्या जवळ पोहचला आहे. भारताचा कोणतीही फलंदाज अर्धशतक करू शकत नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडने चांगली बॉलिंग केली. गोलंदाजीनंतर बॅटिंगनेही किवी टीमने प्रभावी डाव खेळला. त्याने अवघ्या दोन विकेट गमावून भारताच्या पहिल्या डावाची धावसंख्या मागे टाकली आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने पाच विकेट गमावून 122 धावा केल्या. दुसर्या दिवशी भारतीय संघ 165 धावांवर संपुष्टात आला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने भारताकडून सर्वाधिक46धावा केल्या. किवी संघाकडून टिम साऊथी आणि काईल जैमीसनने प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्टला 1 विकेट मिळाली. दुसऱ्या दिवशी सामन्याच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडने भारताला ऑलआऊट केले. या सामन्यात अजून तीन दिवसाचा खेळ बाकी आहेत. न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व ठेवले आहे आणि त्याच्याकडे सात विकेट बाकी आहेत.