भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) मधील मालिकेतील दुसरा सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळला जात आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारताला न्यूझीलंडने पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट केले. सामन्यात फलंदाजांनी शानदार कामगिरी बजावली. भारताकडून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihar) यांनी अर्धशतकी डाव खेळला. पृथ्वी आणि पुजाराने 54, विहारीने 55 धावा केल्या. न्यूझीलंडकडून काईल जैमीसन (Kyle Jamieson) ने तुफान गोलंदाजी केली. त्याने टेस्ट कारकिर्दीत पहिल्यांदा 5 विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊथी यांनी प्रत्येकी 2, नील वॅग्नर ने 1 गडी बाद केला. विहारी आणि पुजरामध्ये पाचव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी झाली. (IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडने जिंकला टॉस, टीम इंडियाची पहिले बॅटिंग; इशांत शर्मा-आर अश्विन Out)
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतासाठी पुन्हा एकदा पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवालच्या जोडीने डावाची सुरुवात केली. पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांना भारताला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. 30 च्या धावसंख्येवर मयंक अग्रवाल 7 धावा करून माघारी परतला. पृथ्वी शॉने 54 धावा फटकावल्या, पण जैमीसनच्या चेंडूवर जेवणापूर्वी त्याने आपली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार विराट कोहली फक्त 3 धावा करुन साऊथीचा शिखर बनला. कोहली पुन्हा एकदा मालिकेत दहाचा आकडा पार करू शकला नाही. त्यांनतर साऊथीने उपकर्णधार अजिंक्य रहाणेला 7 धावा करून पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला. चांगल्या लयीत दिसणाऱ्या विहारीने 67 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर पुजाराने आपले एकाग्रता गमावली आणि 54 च्या स्कोरवर वॉटलिंगकडे झेलबाद झाला. रिषभ पंत धावांवर 12 धावांवर बोल्ड झाला. याच ओव्हरमध्ये जैमीसनने उमेश यादवला शून्यावर झेलबाद केले. आर अश्विनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आलेला रवींद्र जडेजा जलद धावा करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. जडेजा जैमीसनचा पाचवा शिकार ठरला.