IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडने जिंकला टॉस, टीम इंडियाची पहिले बॅटिंग; इशांत शर्मा-आर अश्विन Out
केन विल्यमसन आणि विराट कोहली (Photo Credit: IANS)

भारत-न्यूझीलंडमधील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना थोड्याच वेळात हेग्ली ओव्हलच्या मैदानात सुरु होईल. सामन्यापूर्वी झालेल्या टॉस दरम्यान यजमान किवी कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. हेगले ओव्हलची खेळपट्टी वेलिंग्टनपेक्षा अधिक हिरवळ आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या निर्णायक टेस्ट सामन्यासाठी भारताने मागील मॅचपासून त्यांच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहे. इशांत शर्माला दुखापतीमुळे वगळण्यात आले असून त्याच्या जागी उमेश यादवला (Umesh Yadav) संधी देण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विनलाही वगळण्यात आले असून त्याच्या जागी अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजाला स्थान मिळाले आहेत.  पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल पुन्हा एकदा डावाची सुरुवात करतील. रिषभ पंतचे प्लेयिंग इलेव्हनमधील स्थानही कायम आहे. भारताची फलंदाजी विशेषतः कठोर परीक्षा घ्यावी लागेल. मागील सामन्यात 10 विकेटने लज्जास्पद पराभवाला सामोरे गेल्यावर भारत सध्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. (IND vs NZ 2nd Test 2020 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar वर)

दुसरीकडे, यजमान न्यूझीलंडच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात भारतावर सर्व विभागात दमदार कामगिरी केली होती. मागील सामन्यातून त्यांच्यासाठी डेब्यू केलेला काईल जैमीसन प्लेयिंग इलेव्हनमध्ये कायम आहे. न्यूझीलंडने एजाज पटेलला (Ajaz Patel) वगळले असून त्याच्या जागी नील वैगनरचा समावेश केला आहे. क्राइस्टचर्चमधील खेळपट्टी पाहता न्यूझीलंडने त्यांच्या सर्वाधिक वेगवान गोलंदाजांना प्लेयिंग इलेव्हनमध्ये सामिल केले आहे. भारताची बॅटिंग त्यांची सर्वात मोठी चिंतेची बाब बाली आहे. मालिकेत क्लीन स्वीप टाळण्यासाठी त्यांना फलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे.

असा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन

भारत: मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आणि उमेश यादव.

न्यूझीलंड: टॉम लाथम, टॉम ब्लंडेल, केन विल्यमसन (कॅप्टन), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डी ग्रैंडहोम, काईल जैमीसन, ट्रेंट बोल्ट, टिम साउथी, आणि नील वैगनर.