IND vs ENG 4th Test: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने 3 विकेट गमावून 270 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात इंग्लिश संघावर 171 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंड गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी मातब्बर इंग्लंड वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. टीम इंडियाची (Team India) गाडी रुळावर आली आहे असे दिसत असताना स्टार इंग्लंड गोलंदाज ओली रॉबिन्सनने बाजी मारली आणि एकाच ओव्हरमध्ये तग धरून फलंदाजी करणाऱ्या घातक भारतीय फलंदाज- रोहित व पुजारा, यांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 127 धावा काढल्या आणि चेतेश्वर पुजाराने त्याला साथ देत 61 धावांचे योगदान देत ओव्हरवर तिसरा दिवस गाजवला. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने (Ollie Robinson) दोन आणि जेम्स अँडरसनने एक विकेट घेतली. (IND vs ENG 4th Test Day 3: रोहित-पुजाराने गाजवले ओव्हल, तिसऱ्या दिवसाखेर भारत 270/3, इंग्लंडवर घेतली भक्कम आघाडी)
सलामीवीर रोहित शर्मा आणि तिसऱ्या स्थानावर आलेल्या कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजारा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 278 चेंडूत 158 धावांची भागीदारी झाली. भारतीय संघ ओव्हलवर विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना रॉबिन्सनने दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत टीम इंडियाच्या गाडीला ब्रेक लावला आणि सहा चेंडूत सामन्याचे चित्र बदलून टाकले. इंग्लिश संघाने पहिल्या डावात 99 धावांची मोठी आघाडी घेतली होती पण दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या शानदार शतकामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहचला आहे. तिसऱ्या दिवशी 80 ओव्हर पूर्ण होईपर्यंत टीम इंडिया आघाडीवर होती, पण इंग्लिश कर्णधार जो रूटने नवीन चेंडू घेण्याचा निर्णय घेतला आणि या नवीन चेंडूने केवळ 5 चेंडूंमध्ये सर्व काही बदलून टाकले. नवीन चेंडूसह रॉबिन्सनने गोलंदाजी सुरु केली. आणि पहिल्याच चेंडूवर पुल शॉट खेळण्याच्या प्रक्रियेत रोहित क्रिस वोक्सकडे कॅच देऊन माघारी परतला. त्यानंतर थोड्याच वेळात, त्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 61 धावांवर खेळत असलेल्या पुजाराही रॉबिन्सनचा शिकार बनला आणि चेंडू त्याच्या बॅटच्या कोपऱ्याला लागून स्लिपमध्ये मोईन अलीच्या हातात गेला.
रोहित शर्मा
HERE WE GO.
Two wickets in the first over with the second new ball! 🙌
Scorecard/Clips: https://t.co/Kh5KyTSOMS
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/eiiedSqEtK
— England Cricket (@englandcricket) September 4, 2021
चेतेश्वर पुजारा
The 🏴 crowd has come alive all of a sudden!
Pujara follows Rohit in the same over 😭
Tune into #SonyLIV now 👉 https://t.co/E4Ntw2hJX5 📺📲#ENGvsINDonSonyLIV #ENGvIND #CheteshwarPujara #Wicket pic.twitter.com/TRW7QayIHM
— SonyLIV (@SonyLIV) September 4, 2021
तथापि पुजाराला अंपायरने आउट दिले नसले तरी जो रूटने रिव्ह्यू घेतला आणि रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की चेंडू पुजाराच्या बॅटला लागला होता आणि अलीच्या हातात गेला. अशाप्रकारे एकाच ओव्हरमध्ये भारताचे दोन सेट फलंदाज माघारी परतले आणि इंग्लिश संघासाठी पुनरागमन करण्याचे दरवाजे उघडले. पण आता सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लिश संघ या दोन महत्वपूर्ण विकेट्सचा किती फायदा करून घेते हे पाहणे रोचक ठरणार आहे.