IND vs ENG 4th Test: ‘शतकवीर’ रोहित शर्माने दिली कबुली, कसोटी संघात जागा टिकवून ठेवण्याच्या शेवटच्या संधीबाबत केले गंभीर विधान
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test: रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल कसोटीत (Oval Test) शतक झळकावले. भारतीय (India) सलामी फलंदाजाचे परदेशी भूमीवर हे पहिले कसोटी शतक ठरले आणि त्याने अखेरीस सर्वाधिक 127 धावांची खेळी खेळली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहितने कबूल केले की 2019 मध्ये कसोटी सामन्यात सलामीला येण्याचा निर्णय हा त्याने घेतलेल्या सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक होता. रोहितला माहित होते की लाल बॉल क्रिकेटमध्ये ही त्याची शेवटची संधी असेल. रोहितच्या शतकामुळे भारतीय संघ ओव्हल कसोटीत भक्कम स्थितीत पोहचला आहे. भारताने इंग्लंडवर तिसऱ्या दिवसाखेर 171 धावांची आघाडी घेतली आहे. रोहित म्हणाला की संघ व्यवस्थापनाने त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय त्याच्यासाठी धोकादायक होता. तो म्हणाला, “माझ्या मनात कुठेतरी हे चालू होते की ही माझी शेवटची संधी आहे. जेव्हा माझ्याकडे ऑफर आली तेव्हा मला आधीच याची जाणीव होती. मी आव्हान स्वीकारण्यासाठी आणि सुरुवातीला मी कशी चांगली कामगिरी करू शकतो हे पाहण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो.” (IND vs ENG 4th Test: इंग्लंड खेळाडूंना ‘ही’ मोठी चुक पडली सर्वात महाग, ओव्हल टेस्टमध्ये Rohit Sharma ने संपुष्टात आणला परदेशात कसोटी शतकाचा दुष्काळ)

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये आठ शतके केली आहेत, ज्यामध्ये त्याने ओपनर म्हणून 5 शतके ठोकली आहेत. त्याने भारतात 7 शतके केली होती, रोहित देशाबाहेर आपले शतक दुष्काळ संपवण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेर प्रतीक्षा तिसऱ्या दिवशी केनिंग्टन ओव्हलवर संपुष्टात आली आणि रोहितने इंग्लंडमध्ये पहिले कसोटी शतक झळकावले. तसेच यापूर्वी लॉर्ड्सवर एक शतक झळकावण्याच्या अगदी जवळ आला पण तो 83 धावांवर बाद झाल्यामुळे चुकला. 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान संधी नाही मिळाल्यानंतर 34 वर्षीय फलंदाजाला सलामीला खेळण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते. “मानसिकदृष्ट्या, मी ते आव्हान स्वीकारण्यास तयार होतो, की मी आघाडीवर चांगली करू शकतो की नाही हे पाहण्यासाठी. मला माहित आहे की मी यापूर्वी मधल्या फळीत फलंदाजी केली होती आणि गोष्टी मला पाहिजे तशा वळल्या नाहीत पण मला माहित होते की ही माझी शेवटची संधी असणार आहे, तुम्हाला माहिती आहे, जे काही व्यवस्थापन विचार करत आहे ते प्रयत्न करून.”

मर्यादित ओव्हर क्रिकेट कारकिर्दीप्रमाणे रोहितनेही कसोटी कारकीर्दीची सुरुवात देखील मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली. 2013 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पण करताना रोहितने सलग दोन कसोटी शतक झळकावले. तथापि, तो आपला फॉर्म कायम ठेवू शकला नाही आणि प्लेइंग इलेव्हनचा अनियमित सदस्य बनला. त्याने 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या कसोटी संघातील स्थानही गमावले. पण रोहितने पुढील वर्षअखेरीस पुनरागमन केले आणि तेव्हापासून तो संघाचा नियमित भाग बनला आहे.