IND vs ENG 4th Test: चौथ्या टेस्ट सामन्यापूर्वी नसीर हुसेन यांनी इंग्लंडला दिली चेतावणी, म्हणाले- ‘भारताला कमी लेखू नका, ही मालिका विसरू नका’
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test: इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन (Nasser Hussain) यांनी भारताविरुद्ध (India) चौथ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला (England) इशारा दिला आहे. इंग्लंडने लीड्समधील तिसऱ्या कसोटीत भारताला एक डाव आणि 76 धावांनी चिरडून पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरी साधली. इंग्लिश गोलंदाजांनी पहिल्या डावात भारताला फक्त 78 धावांवर गुंडाळले आणि नंतर फलंदाजनी 432 धावांचा डोंगर उभारला ज्याने संघाला मोठा विजय मिळवून दिला. विजयानंतर इंग्लंडचा आत्मविश्वास उंचावला आहे पण यजमानांनी भारताला कमी लेखू नये असे मत हुसेन यांनी व्यक्त केले आहे. भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त पुनरागमन कसे केले याची आठवण करून दिली. अ‍ॅडिलेड (Adelaide) कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या 36 धावांवर ऑलआऊट झाल्यावर टीम इंडियाला (Team India) धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. भारताने शेवटच्या चार कसोटींमध्ये अपराजित राहून 2-1 असा विजय मिळवला आणि सलग दुसऱ्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. (IND vs ENG 4th Test: फ्लॉप कामगिरीनंतर Rishabh Pant वर टांगती तलवार, ओव्हल कसोटीसाठी ‘या’ कारणामुळे रिद्धिमान साहा असला पाहिजे पसंती)

लीड्समधील विजयानंतर इंग्लंडने उर्वरित मालिकेत भारताला कमी लेखण्याची चूक करू नये, असे हुसेन म्हणाले. “हेडिंग्ले येथे, इंग्लंडने चेंडू गोल फिरवला. भारताचे सीम गोलंदाज कुशल आहेत त्यांनी चेंडू अजिबात स्विंग केला नाही. पण इंग्लंडने आता शेवटची गोष्ट करणे आवश्यक आहे की इंग्लंडने खूप मेहनत केली आहे, ज्यामुळे भारताविरुद्ध चौथ्या कसोटी आणि पाचव्या कसोटीत त्यांचे पारडे जड आहे. इंग्लंडच्या फलंदाजी हल्ल्यासाठी येथील मैदाने अधिक अनुकूल आहेत. मात्र, इंग्लंडने भारताला कमी लेखण्याची चूक करू नये,” माजी इंग्लिश कर्णधाराने द टेलीग्राफसाठी आपल्या कॉलममध्ये लिहिले. “लक्षात ठेवा, ते गेल्या वर्षी अखेरीस अ‍ॅडिलेड येथे ऑस्ट्रेलियाने 36 धावांवर बाद झाले होते पण प्रसिद्ध मालिका जिंकत कमबॅक केले. आणि ते ही कोहली घरी गेल्यानंतरही,” ते पुढे म्हणाले.

हुसेनने भारताच्या लढाऊ भावनेचे कौतुक केले आणि इंग्लंडला पाहुण्यांपासून सावधानतेचा इशारा दिला, त्यांच्याकडे परत लढण्याची क्षमता आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या सामर्थ्याने व चारित्र्याने मालिका जिंकण्याची क्षमता आहे. हुसेनने लिहिले, “भारताकडे चारित्र्य आणि लढाईची बरीच ताकद आहे व त्यामध्ये मध्यवर्ती त्यांचा कर्णधार आहे, जरी कोहली इंग्लिश परिस्थिती आणि 2018 मध्ये इंग्लंड गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्यापेक्षा 2014 च्या आवृत्तीसारखा दिसत आहे.”