IND vs ENG 4th Test Day 3: इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी भारतीय संघाला (Indian Team) मोठा धक्का बसला आहे. अहमदाबाद कसोटी (Ahmedabad Test) सामन्याच्या दुसऱ्या गोलंदाजी करताना संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) तिसर्या दिवशी लंचच्या अगदीपूर्वी दुखापतग्रस्त होऊन उपचारासाठी मैदानाबाहेर पडला आहे. सिराजची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप समोर आले नाही, परंतु टीम फिजिओ नितीन पटेल सिराजला मैदानातून बाहेर घेऊन जाताना दिसले आणि यादरम्यान सिराजला भरपूर वेदना होत असल्याचे दिसून आले. जर तिसऱ्या दिवशी सिराज मैदानावर परत आला नाही तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का सिद्ध होईल. मात्र, या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 160 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. तिसर्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत इंग्लंडने दुसर्या डावात बिंबाद तीन ओव्हरमध्ये 6 धावा केल्या असून यजमान संघाच्या अद्याप 154 धावा मागे आहे. (IND vs ENG 4th Test Day 3: वॉशिंग्टन सुंदर 96 धावांवर नाबाद, भारताचा पहिला डाव 365 धावांवर संपुष्टात; लंचपर्यंत इंग्लंडची 154 धावांनी पिछाडी)
इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीने सिराजच्या चेंडूवर फलंदाजी करताना उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह शॉट खेळला. यादरम्यान, सिराजने चेंडू रोखण्यासाठी उडी घेतली. सिराज चेंडू रोखण्यात यशस्वी झाला परंतु त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. सिराज दुखापतग्रस्त होऊ मैदानाबाहेर जोडल्यावरतिसऱ्या दिवसाच्या लंचची घोषणा करण्यात अली. यापूर्वी, तिसर्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 365 धावांवर संपुष्टात आला. यादरम्यान वॉशिंग्टन सुंदर आपले शतक पूर्ण करण्यास वंचित राहिले आणि नाबाद 96 धावा करुन माघारी परतला. शिवाय, संघासाठी पहिल्या डावात युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने 101 धावांची शानदार शतकी खेळी केली. पंतने आपल्या जबरदस्त खेळी दरम्यान 118 चेंडूंचा सामना करत 13 चौकार आणि दोन षटकार लगावले.
तसेच रोहित शर्माने 49 आणि अक्षर पटेलने 43 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनने 3 आणि जॅक लीचने 2 विकेट्स घेतल्या.