IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबाद (Ahmedabad) येथील इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी मैदानावर उतरताच भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कर्णधारांच्या एलिट यादीत महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या एका विशिष्ट विक्रमात बरोबरी करेल. इंग्लिश संघाविरुद्ध मोटेराच्या नवनिर्मित नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात यजमान भारतीय संघाने फिरकीपटूंच्या आक्रमक कामगिरीच्या जोरावर 10 विकेटने दणदणीत विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. यामुळे आता टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या एक पाऊल जवळ आली आहे आणि चौथ्या सामन्यात पूर्ण तयारीने विराटसेना विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरेल. 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या सामन्यात कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल आणि कॅप्टन म्हणून 60वा सामना खेळले. (IND vs ENG 4th Test 2021: चौथ्या अहमदाबाद टेस्टमध्ये Jasprit Bumrah याची जागा घेण्यासाठी 3 गोलंदाजांमध्ये चुरस, ‘हा’ आहे मुख्य दावेदार)
इंग्लंडविरुद्ध टॉससाठी मैदानात उतरताच विराट माजी कर्णधार धोनीच्या कर्णधार म्हणून 60 सामन्यांची बरोबरी करेल. धोनीने भारताकडून 2008 ते 2014 दरम्यान कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळले आहेत तर तिसरा अहमदाबाद सामना विराटचा कर्णधार म्हणून 59वा सामना होता. धोनीच्या 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर विराटला भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विराटच्या नेतृत्वात संघाने 35 सामने जिंकले आहेत तर 14 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. शिवाय, 10 सामने अनिर्णीत राहिले आहेत. या उलट धोनीच्या नेतृत्वात संघाने 27 कसोटी सामानाने जिंकले आहेत आणि 18 सामने गमावले आहेत तर 15 अनिर्णीत राहिले आहेत. दुसरीकडे, कर्णधार म्हणून सर्वाधिक टेस्ट सामने खेळण्याचा रेकॉर्ड माजी दक्षिण आफ्रिकी फलंदाज ग्रीम स्मिथच्या नावावर आहे ज्यांनी 109 कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे.
इतकंच नाही तर विराटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून हा 192वा सामना असेल. कोहलीला सर्वप्रथम 2013 मध्ये वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड देखील भारताचा दोन वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार धोनीच्या नावावर आहे. धोनीने 2007 ते 2018 दरम्यान भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 332 सामन्यात नेतृत्व केले आहेत.